Maharashtra News 1
Register

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठात शनिवारी आंतरराष्ट्रीय परिषद

schedule12 Feb 26 person by visibility 19 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातर्फे शनिवारी (१४ फेब्रुवारी २०२६) ‘आधुनिक रसायनशास्त्राद्वारे शाश्वत उपायया विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. झेक रिपल्बिक येथील प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. इंद्रजीत घोष यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होईल.  प्रभारी प्रकुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांची प्रमुख उपस्थिती असेल, अशी माहिती अधिविभाग प्रमुख डॉ. संजय चव्हाण यांनी दिली आहे.

परिषदेत सुमारे ३५० पेक्षा अधिक देशविदेशांतील संशोधक, शिक्षक, विद्यार्थी सहभागी होणार असून दोनशेहून अधिक शोधनिबंध सादर करण्यात येतीलशिवाजी विद्यापीठाच्या रँकिंग फ्रेमवर्कमध्ये आघाडीचे स्थान प्राप्त केलेला रसायनशास्त्र अधिविभाग डीएसटी-फिस्ट आणि युजीसी-सॅप योजनेअंतर्गत मान्यताप्राप्त आहे. .एन.आर.एफ.-पेअर उपक्रम आणि भारत सरकारच्या खनिकर्म मंत्रालयातर्फेही मान्यताप्राप्त आहे. अधिविभागातर्फे आयोजित एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत रसायनशास्त्रावर आधारित उपायांद्वारे शाश्वत विकास, ऊर्जा आणि पर्यावरणातील जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी अभिनव आणि उदयोन्मुख कल्पनांच्या देवाणघेवाणीच्या अनुषंगाने विचारमंथन करण्यात येणार आहे.

 परिषदेत प्रा. ग्यानविटो विले (इटली), प्रा. जगदीश राजेनहळ्ळी (जर्मनी), डॉ. सचिन नानावटी (इंग्लंड), प्रा. अनंत कापडी, आयसीटी, मुंबई, डॉ. दिनेश सावंत, एनसीएल, पुणे, प्रा. व्यंकट कृष्णन, आयआयटी, मंडी आदी नामवंत शास्त्रज्ञ परिषदेस उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेचे समन्वयक म्हणून डॉ. संजय कोळेकर काम पाहात असून प्रा. एस. पी.  हंगीर्गेकर, प्रा. गजानन राशिनकर हे विविध समित्यांचे प्रमुख आहेत. परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख प्रा. कल्याणराव गरडकर आहेत. डॉ

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes