Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात काँग्रेस चालवतो शिवसेना ठाकरे पक्ष, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचा राजीनामा स्ट्रक्चरल इंजिनियर्सतर्फे शनिवारी एकदिवसीय कार्यशाळा महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी राजेश लाटकर, काँग्रेसकडून निवडीसंबंधी महापौरांना पत्रकुंभोज येथील सरस्वती साधना केंद्र संस्कृती रक्षणासाठी महत्वपूर्ण : ललित गांधीसमृद्ध शाळा - समृद्ध प्राथमिक आरोग्य केंद्र राज्यासाठी आदर्शवत, जिल्हा नियोजन समितीत गौरवोद्गगारकोल्हापूर-मुंबई मार्गावर सकाळ – संध्याकाळच्या सत्रात विमानसेवा, दोन मार्चपासून प्रारंभमेन राजारामच्या विद्यार्थिनींनी जिंकली राज्यस्तरीय स्पर्धा ! पालकमंत्र्यांनी केले कौतुक, जिल्हा प्रशासनाने दिले बक्षीस!!शाहू मिलच्या डेव्हलपमेंटसंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक - पालकमंत्री प्रकाश अबिटकर सार्थक क्रिएशन्सच्या रौप्यमहोत्सवानिमित्त गुरुवारी विशेष कार्यक्रम, मान्यवरांचा सन्मान होणारअंगणवाडी कर्मचाऱ्यांची निदर्शने, अन्यथा  गुरुवारपासून कामबंद आंदोलन

जाहिरात

 

कोल्हापुरात काँग्रेस चालवतो शिवसेना ठाकरे पक्ष, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचा राजीनामा

schedule11 Feb 26 person by visibility 190 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : महापालिका निवडणुकीतील जागा वाटपातील घोळ, निवडणुकीत पक्षाच्या वाटेला आलेला पराभव त्यामुळे शिवसेनेतील अस्वस्थता संपायची काही चिन्ह दिसेनात. शिवसेनेचे शहर उपप्रमुख शशिकांत बिडकर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे तसेच जिल्हा झोपडपट्टी संघटक पदाचाही त्यांनी राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी राजीनामा देताना असे म्हटले आहे की, " सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना ठाकरे पक्ष हा काँग्रेस पक्षातर्फे चालविला जात आहे. यामुळे पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व राहिले नाही. त्यास कंटाळून शिवसेना ठाकरे पक्षातील पदाचा राजीनामा देत आहे ". बिडकर यांनी महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून निवडणूक लढवली होती. गेले काही दिवस ते शिवसेनेत नाराज दिसत होते. त्यांनी शिवसेना शहरप्रमुख सुनील मोदी यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. मोदी यांनीही काही दिवसांपूर्वी शहरप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता मात्र पक्षाने तो स्वीकारला नसल्याचे वृत्त आहे. दरम्यान कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्ष यांची आघाडी झाली होती. जागा वाटपात  शिवसेनेला सहा जागा मिळाल्या होत्या. नगरसेविका प्रतिज्ञा उत्तरे यांच्या रूपाने शिवसेनेचा एकमेव नगरसेवक महापालिकेवर निवडून आला आहे. शिवसेना ठाकरे पक्षात  गटबाजी आहे. पदाधिकाऱ्यांच्यामध्ये ही एकवाक्यता नाही.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes