Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
णण ङतणण चतप्रा. डॉ. जे. बी. शिंदे यांचे निधन विवेक सिद्ध यांना जीवन प्रकाश समाज गौरव पुरस्कार डीवाय पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर ठरला राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचा विजेता कोल्हापुरात काँग्रेस चालवतो शिवसेना ठाकरे पक्ष, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचा राजीनामा स्ट्रक्चरल इंजिनियर्सतर्फे शनिवारी एकदिवसीय कार्यशाळा महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी राजेश लाटकर, काँग्रेसकडून निवडीसंबंधी महापौरांना पत्रकुंभोज येथील सरस्वती साधना केंद्र संस्कृती रक्षणासाठी महत्वपूर्ण : ललित गांधीसमृद्ध शाळा - समृद्ध प्राथमिक आरोग्य केंद्र राज्यासाठी आदर्शवत, जिल्हा नियोजन समितीत गौरवोद्गगार

जाहिरात

 

प्रा. डॉ. जे. बी. शिंदे यांचे निधन

schedule12 Feb 26 person by visibility 71 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :  प्रबोधन साहित्य संमेलनाचे प्रवर्तक, प्रा. डॉ. जे बी शिंदे यांचे गुरुवारी 12 फेब्रुवारी 2026 रोजी वार्धक्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते 86 वर्षाचे होते.कोल्हापूरमध्ये सुमारे अकरा वर्षे त्यांनी अत्यंत चिकाटीने प्रबोधन साहित्य संमेलन घेऊन एक परंपरा निर्माण केली. संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले अशा  महामानवांचा त्यांचा सखोल अभ्यास होता. पुरोगामी विषयावर त्यांनी शेकडो व्याख्याने दिली, लेख लिहिले, पुस्तके लिहिली.ते  जय भारत शिक्षण संस्थेचे  संस्थापक सचिव  व सरस्वती शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष होते. चित्रलेखा मधील त्यांचे स्तंभ लिखाण विशेष गाजले. ते माध्यमिक शिक्षक होते विक्रम हायस्कूल येथे काही काळ त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी केली त्यानंतर वसंतराव नाईक अध्यापक महाविद्यालय येथे प्राध्यापक म्हणून रुजू झाले त्यानंतर कमला कॉलेज येथे मराठीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी अनेक वर्षे नोकरी  केली. कमला कॉलेजमधील मराठी विभाग प्रमुख म्हणून त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केले.  गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले   सायंकाळी साडेचार वाजण्याच्या  सुमारास पंचगंगा स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या मागे, भाऊ बहीण,पत्नी,  दोन मुले, सुना, मुलगी, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी 13 फेब्रुवारी रोजी आहे.शोकसभा शनिवार १४ रोजी सायंकाळी पाच वाजता भारतीय कम्युनिस्ट पक्ष बिंदू चौक येथे होणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes