Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
प्रा. डॉ. जे. बी. शिंदे यांचे निधन विवेक सिद्ध यांना जीवन प्रकाश समाज गौरव पुरस्कार डीवाय पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर ठरला राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचा विजेता कोल्हापुरात काँग्रेस चालवतो शिवसेना ठाकरे पक्ष, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचा राजीनामा स्ट्रक्चरल इंजिनियर्सतर्फे शनिवारी एकदिवसीय कार्यशाळा महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी राजेश लाटकर, काँग्रेसकडून निवडीसंबंधी महापौरांना पत्रकुंभोज येथील सरस्वती साधना केंद्र संस्कृती रक्षणासाठी महत्वपूर्ण : ललित गांधीसमृद्ध शाळा - समृद्ध प्राथमिक आरोग्य केंद्र राज्यासाठी आदर्शवत, जिल्हा नियोजन समितीत गौरवोद्गगारकोल्हापूर-मुंबई मार्गावर सकाळ – संध्याकाळच्या सत्रात विमानसेवा, दोन मार्चपासून प्रारंभमेन राजारामच्या विद्यार्थिनींनी जिंकली राज्यस्तरीय स्पर्धा ! पालकमंत्र्यांनी केले कौतुक, जिल्हा प्रशासनाने दिले बक्षीस!!

जाहिरात

 

विवेक सिद्ध यांना जीवन प्रकाश समाज गौरव पुरस्कार

schedule12 Feb 26 person by visibility 23 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : जीवन प्रकाश बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने यंदाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.  या पुरस्कार सोहळ्यात ‘जीवनप्रकाश राज्यस्तरीय समाज गौरव पुरस्काराने’ विवेक सिद्ध यांना सन्मानित करण्यात आले. सामाजिक स्तरावर त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला.

जीवन प्रकाश बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व जीवनप्रकाश पब्लिक स्कुल व पॅरामेडिकल कॉलेज यांच्या वतीने शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.  महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा यामध्ये सहभाग होता. यावेळी आयोजक मंडळा तर्फे  डॉ. प्रकाश  दीपंकर यांनी, “समाज हितासाठी निस्पृहपणे कार्य करणाऱ्या लोकांचा सन्मान सोहळा आम्ही यासाठी आयोजित केला आहे कि यातून समाजातील युवकांनी प्रेरणा घेवून सामाजिक कार्यासाठी पुढे यावे हा उद्देश आहे.” असे नमूद केले.

या सोहळ्यासाठी राजेंद्र पाटील यड्रावकर, नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, उपनगराध्यक्ष अनुराधा आडके, प्रा. शशिकांत कुलकर्णी, विशाल म्हतुगडे, डॉ.अभिता दीपंकर, चंद्रकला हलसवडेकर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes