+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustदादा, वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा ! आपल्या मार्गदर्शनाने जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मिळतेय प्रेरणा ! ! adjustआपली उमेदवारी फाइनल, शिवसेनेतर्फे २८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार-राजेश क्षीरसागर adjustजीएसटी अधिकाऱ्याला २५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले adjustउत्तम संवाद कौशल्य म्हणजे उत्तम करिअरची संधी- डॉ विश्वनाथ मगदूम adjustजिल्ह्यातील हॉटेल, बार, दारु दुकाने रात्री अकरानंतर बंद ! जिल्हा प्रशासनाचा आदेश adjustप्रत्येक निवडणुकीत कोल्हापूर दक्षिणमध्ये मतदानाचा चढता आलेख ! नवीन २६ मतदान केंद्रे !! adjustइचलकरंजी भाजपा कार्यालयात आवाडेंचे उत्साही स्वागत ! शशिकला जोल्ले, सुरेश हाळवणकरांनी केले स्वागत !! adjustजिल्हा परिषद कर्मचारी महासंघातर्फे आढावा बैठक adjustकरवीर तालुका शिक्षक-शिक्षकेतर पतसंस्थेतर्फे सभासदांना दीपावली भेट वस्तू वाटप adjustकोल्हापूर दक्षिणची जनता माझ्यासोबत ! निवडणुकीत नक्की पाठीशी राहील !! अमल महाडिक
1001157259
1001130166
1000995296
schedule26 Sep 24 person by visibility 96 categoryउद्योग
बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ, पायाभूत सुविधांना प्राधान्य देणार – सभापती प्रकाश देसाई
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पायाभूत सुविधांची पूर्तता करा, रस्ते, वीज, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, सुरक्षा रक्षकांची संख्या अशा विविध प्रश्नाकडे विविध घटकाच्या प्रतिनिधींनी लक्ष वेधले. याप्रसंगी बोलताना सभापती अॅड. प्रकाश देसाई यांनी, ‘कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्नात दोन कोटी ४४ लाख रुपयांनी वाढ झाली आहे. समितीच्या एकूण ठेवी १८ कोटी ४४ लाखावर गेल्या आहेत. बाजार समितीत चांगल्या सेवा, पायाभूत सुविधांना प्राधान्यक्रम देऊ ’अशी ग्वाही दिली.
कोल्हापूर शेती उत्पन् बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (२५ सप्टेंबर २०२४) झाली. मार्केट यार्डातील मल्टिपर्पज हॉल येथे सभा झाली.बाजार समितीचे सचि जयवंत पाटील यांनी अहवाल वाचन केले. दरम्यान या सभेत फळ विक्रेत्यातर्फे प्रसाद वळंज यांनी फळ बाजारातील घटत असलेल्या आवकेकडे लक्ष वेधले. तसेच शाहू सांस्कृतिक मंदिराची दुरुस्तीचा विषय मांडला. 
धान्य व्यापारी वैभव सावर्डेकर यांनी बाजार समितीचा वाढता खर्च निदर्शनास आणला. धान्याची वाहने नाक्यावर जास्त काळ थांबून राहतात.त्यामुळे नाके त्वरित हटवावीत. प्लॉटधारकांना प्रॉपर्टी कार्डे द्यावीत असा मुद्दा मांडला.
कांदा व्यापारी मनोहर चूघ यांनी कांदा-बटाटा बाजाराला चांगल्या सुविधा मिळाव्यात अश मागणी केली. विविध घटकाच्या प्रतिनिधींनी बाजार समितीमधील सेवा सुविधांकडे लक्ष वेधले. गुळाला साडेसहा हजार रुपयांचा भाव मिळावा असा ठराव गूळ उत्पादकांनी मांडला. सभापती देसाई यांनी बाजार समितीत पायाभूत सुविधा उपलब्ध करू. आवारात सीसीटीव्ही बसविले जातील. बायोगॅस प्रकल्प उभारणी व सौर ऊर्जा प्रकल्प राबविणार असल्याचे सांगितले.
उपसभापती सोनल पाटील यांनी आभार मानले. सभेला संचालक भारत पाटील भुयेकर, सुर्यकांत पाटील, कुमार आहुजा, प्रकाश कांबळे, शंकर पाटील, मेघा देसाई, संभाजी पाटील, सुयोग वाडकर, पांडूरंग काशीद आदी उपस्थित होते.