+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ
Screenshot_20240226_195247~2
schedule15 Jan 23 person by visibility 367 categoryक्रीडा
भारतीय फुटबॉल संघटनेचे सचिव प्रभाकरन यांचा विश्वास
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
लहान मुलांमध्ये फुटबॉलची गोडी वाढवणे, उत्कृष्ट प्रशिक्षन, तज्ञ प्रशिक्षक, गुणवान खेळाडूंची निवड, सातत्याने सराव, स्पर्धांची संख्या वाढवणे, केंद्र आणि राज्य सरकारची मदत, फुटबॉल चे मार्केटिंग आणि मोठ्या उद्योग समूहांचे प्रायोजकत्व या जोरावर भारतीय फुटबॉल संघ 2047 पर्यंत भारतीय संघआशिया खंडात अव्वल चार संघांमध्ये असेल. भारत विश्वचषक स्पर्धेत आपली दावेदारी सिद्ध करेल, असा विश्वास अखिल भारतीय फुटबॉल संघटनेचे सचिव शाजी प्रभाकर यांनी व्यक्त केला.
संतोष ट्रॉफी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेतील ग्रुप चार मधील सामने कोल्हापुरात खेळण्यात आले. या स्पर्धेतील पश्चिम बंगाल आणि महाराष्ट् सामन्याचे उद्घाटन करण्यासाठी ए आय एफ एफ चे प्रभाकर कोल्हापूर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
 फुटबॉल महासंघाने 2047 पर्यंत भारतात फुटबॉल विस्तारासाठी रोड मॅप तयार केलेला आहे अशी माहिती त्यांनी दिली. प2026 पर्यंत भारतीय सतरा वयोगट मुले आणि मुलींचे संघ विश्व चषक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरतील, असा विश्वास प्रभाकरण यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, भारतात फुटबॉलचा विकास होण्यासाठी ग्रासूरुटवर प्रयत्न केले जाणार आहेत. 2026 पर्यंत देशातील साडेतीन कोटी लहान मुले फुटबॉल खेळतील तर 2047 पर्यंत दहा कोटी लहान मुले फुटबॉल कडे वळतील असे लक्ष्य भारतीय फुटबॉल महासंघाने ठेवलेले आहे.
ते म्हणाले,फुटबॉलचा विकास आणि विस्तार करण्यासाठी लहान मुलांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. त्यासाठी मैदान व अन्य पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. केंद्र सरकारने राज्य सरकारांची मदत घेतली जाईल. प्रशिक्षकांना उच्च दर्जाचे मार्गदर्शन केले जाईल. गुणवान खेळाडू निवडून त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. या खेळाडूंना जास्तीत जास्त सामने खेळता येतील यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. 2047 पर्यंत भारतात शंभर प्रोफेशनल क्लब तयार झाले पाहिजेत यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
फुटबॉल च्या विकासासाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान 50 मैदाने सरावासाठी असावे यासाठी स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची मदत घेतली जाईल. तसेच 12 स्मार्ट सिटी मध्ये मोठी मैदानी बांधली जातील, आणि फिफा वर्ल्ड कप साठी असलेली तेरा दर्जेदार मैदाने बांधण्याचे नियोजन करण्यात येईल. ऑलिंपिक यजमान पदासाठी भारत प्रयत्न करत आहे. या प्रयत्नाचा फायदा फुटबॉलच्या विकासासाठी होईल असा विश्वास ही प्रभाकर यांनी व्यक्त केला.
पत्रकार परिषदेला विफाचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, विफा महिला फुटबॉल संघाच्या अध्यक्षा मधुरिमा राजे, सचिव सोलर वॉझ उपस्थित होते.
....
प्रभाकर यांच्याकडून कोल्हापूरची कौतुक
कोल्हापूरचे वातावरण फुटबॉलमय आहे असे कौतुक प्रभाकर यांनी केले. इथले फुटबॉल शौकीन खेळाडू आणि संघांना प्रोत्साहन देतात. असे वातावरण भारतातील फारच कमी शहरात पहायला मिळते. फुटबॉलला प्रोत्साहन करणारे प्रेक्षक कोल्हापूर मध्ये पाहायला मिळतात. कोल्हापूर हे उदाहरण संपूर्ण देशभर आम्ही सांगू शकतो असेही त्यांनी सांगितले.