+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustहातकणंगले गटशिक्षणाधिकारीपदी रवींद्रनाथ चौगुले adjustघोडावत विद्यापीठात एम फार्म कोर्स सुरू adjustवारणा विद्यापीठ - टेलर्स युनिव्हर्सिटी मलेशिया यांच्यामध्ये सामंजस्य करार adjustग्रंथ जगण्याची प्रेरणा देतात - समीर देशपांडे adjustकृष्णराज महाडिक उगवता सूर्य, आज ना उद्या नक्की दिवस उगवणार ! अपेक्षा न करता, आपण काम करत करायचं !! adjustकेएमसी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन adjustप्रख्यात भूलतज्ज्ञ डॉ. शकील मोमीन यांना जीवनगौरव पुरस्कार, केएमएतर्फे वीस ऑक्टोबरला वितरण adjustजितो कोल्हापूरचा पदग्रहण समारंभ दिमाखात ! अध्यक्षपदी रवी संघवी, मुख्य सचिवपदी अनिल पाटील, खजानिसपदी सिताराम कोरडे !! adjustकोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे दोन दिवसीय केएमए-कॉन परिषद adjust दूध विक्रीत गोकुळचा नवा उच्चांक , कोजागिरीनिमित्त 18 लाख 65 हजार लिटर दूध विक्री
1001130166
1000995296
schedule11 Oct 24 person by visibility 110 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जातिवंत म्हैस पाळायची आहे, त्यासाठी आता इतर राज्यात शोध घ्यायचा, त्या ठिकाणाहून खरेदी करायची आवश्यकता नाही. दूध उत्पादक शेतकऱ्यांची गरज लागत लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) पुढाकारातून केर्लीमध्ये जातिवंत म्हैस विक्री केंद्र सुरू झाले आहे. गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते या केंद्राचे शुक्रवारी (११ ऑक्टोबर) उद्घाटन झाले. या म्हैस विक्री केंद्रावरती खरेदी केलेल्या म्हैशींना गोकुळमार्फत ३० हजार रुपये अनुदान मिळणार आहे.
गोकुळ व एन.डी.डी.बी. डेअरी सर्व्हिसेस, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या या केंद्रात  जातिवंत मुऱ्हा, मेहसाणा,जाफराबादी म्हैशी शेतकऱ्यांना मिळणार आहेत. यासंबंधी बोलताना चेअरमन डोंगळे म्हणाले, ‘ केर्लीतील केंद्रातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना जातिवंत, दुधाळ व सशक्त म्हैशी उपलब्ध होणार असून यामुळे म्हैस दूध उत्पादन वाढीसाठी निश्चितच चालना मिळणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी संघ नियमानुसार आपल्या पसंतीनुसार स्व:जबाबदारीने दुधाची खात्री करूनच या केंद्रातून म्हैशी खरेदी कराव्यात व उत्तम व्यवस्थापनाद्वारे त्यांचे संगोपन करावे.”
म्हैस विक्री केंद्रामध्ये खरेदी केलेल्या म्हैशीसाठी गोकुळमार्फत तीस हजार रुपयांचे अनुदान  मिळणार आहे. त्यापैकी आर्थिक मदत म्हणून ५ हजार रुपये अनुदान प्रस्ताव सादर केलेनंतर तात्काळ देण्यात येईल असे चेअरमन डोंगळे यांनी सांगितलेे. ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील म्हणाले, ‘जातिवंत म्हैस विक्री केंद्रामुळे गोकुळच्या दूध उत्पादकांना परराज्यातील जनावरे खरेदीसाठी येणाऱ्या अडीअडचणी कमी होणार असून खर्चात बचत होण्यास मदत होणार आहे. दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.’
 या कार्यक्रमावेळी नवीन म्हैस विक्री केंद्रातून म्हैस खरेदी केलेल्या दूध उत्पादक राणी कोंडीराम पोवार, प्रतिमा दूध संस्था – निटवडे, बाबासो केरबा दिवसे, नागनाथ दूध संस्था- नागदेववाडी, बळीराम पांडुरंग साळोखे, पंचगंगा दूध संस्था – आंबेवाडी, नवनाथ केरबा गुडाळे, जखनाई दूध संस्था - राशिवडे बु।।, हरीश भिकाजी दळवी, धरमीमाई दूध संस्था गवसे पैकी पाटीलवाडी, बाबू व्यंकू कागणकर, विठ्ठल दूध संस्था – तावरेवाडी यांचा  सत्कार करण्यात आला.    
गोकुळचे  संचालक बाबासाहेब चौगले यांनी प्रास्ताविक केले. एन.डी.डी.बी. मुंबई चे जनरल मॅनेजर डॉ. शिवकुमार पाटील यांनी मार्गदर्शन केले.  संचालक शशिकांत पाटील–चुयेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला संचालक अभिजित तायशेटे,  किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, डॉ.मोहम्मद तारिक, डॉ.उदयकुमार मोगले, व्यवस्थापक पशुसंवर्धन डॉ.प्रकाश साळुंखे उपस्थित होते.