+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustदादा, वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा ! आपल्या मार्गदर्शनाने जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मिळतेय प्रेरणा ! ! adjustआपली उमेदवारी फाइनल, शिवसेनेतर्फे २८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार-राजेश क्षीरसागर adjustजीएसटी अधिकाऱ्याला २५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले adjustउत्तम संवाद कौशल्य म्हणजे उत्तम करिअरची संधी- डॉ विश्वनाथ मगदूम adjustजिल्ह्यातील हॉटेल, बार, दारु दुकाने रात्री अकरानंतर बंद ! जिल्हा प्रशासनाचा आदेश adjustप्रत्येक निवडणुकीत कोल्हापूर दक्षिणमध्ये मतदानाचा चढता आलेख ! नवीन २६ मतदान केंद्रे !! adjustइचलकरंजी भाजपा कार्यालयात आवाडेंचे उत्साही स्वागत ! शशिकला जोल्ले, सुरेश हाळवणकरांनी केले स्वागत !! adjustजिल्हा परिषद कर्मचारी महासंघातर्फे आढावा बैठक adjustकरवीर तालुका शिक्षक-शिक्षकेतर पतसंस्थेतर्फे सभासदांना दीपावली भेट वस्तू वाटप adjustकोल्हापूर दक्षिणची जनता माझ्यासोबत ! निवडणुकीत नक्की पाठीशी राहील !! अमल महाडिक
1001157259
1001130166
1000995296
schedule19 Oct 24 person by visibility 591 categoryराजकीय
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या जागा वाटप व उमेदवारी निश्चितीरून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस वाढत आहे. चंदगड व कोल्हापूर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाने त्याला जोरदार हरकत घेतली आहे. ज्यांना कोणाला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे  जिल्ह्यात अस्तित्व नाही असे वाटते त्यांनी कोल्हापूर जिल्हापुरता मैत्रीपूर्ण लढत करण्याची हिम्मत ठेवावी. म्हणजे कोण किती पाण्यात आणि कोण किती पाण्यावरआहे हे समजेल असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी दिला. चंदगड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार बदला या मागणीसाठी काही मंडळी महागाव येथे रविवारी मेळावा घेणार आहेत असे समजते. त्यांनी मेळावा  जर रद्द केला नाही तर आम्हालाही प्रत्येक ठिकाणी वेगळी भूमिका घ्यावी लागेल असा इशाराही पाटील यांनी दिला
 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी कोणताही समझोता केला जाणार नाही. कोल्हापूर उत्तर हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा मतदार संघ आहे. त्यावर आमचा 100 टक्के दावा आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादीलाच मिळाला पाहिजे अशी आग्रही भूमिका ही पाटील यांनी मांडली. कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे नेते म्हणून आमदार सतेज पाटील हे काम बघतात मात्र त्यांनी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय चर्चा करण्यासाठी आम्हाला विश्वासात घेतले नाही. काँग्रेस परस्पर प्रत्येक विधानसभा मतदारसंघावर दावा करत आहे. पूर्वी लोकसभेचे कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघ राष्ट्रवादीकडे होते. मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघ हा राष्ट्रवादीने काँग्रेससाठी सोडला तर हातकणंगले मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला दिला. त्यावेळी कोल्हापूर उत्तर मतदारसंघ राष्ट्रवादीकडे देण्याची चर्चा झाली होती असे असताना आता काँग्रेसचे नेते मंडळी त्या साऱ्या गोष्टींना बगल देऊन सर्वच जागेवर हक्क सांगत आहेत काँग्रेसच्या या भूमिकेला आमचा विरोध आहे. लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघातील उमेदवार शाहू महाराज यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट,  शिवसेना ठाकरे गट व काँग्रेससह महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांनी प्रयत्न केले होते मात्र विजयाचे श्रेय केवळ काँग्रेसचे नेते मंडळी घेत आहेत. आमच्यामुळेच हे यश मिळाल्याचे दाखवण्याचा प्रयत्न काँग्रेस का करत आहे ?  मुळात शाहू छत्रपती हे निवडणूकीसाठी तयार नव्हते परंतु व्ही बी  पाटील व पी एन पाटील यांनी शाहू महाराजांना जनतेच्या हितासाठी  निवडणूक लढवावी लागेल असे सांगून त्यांना निवडणूकसाठी तयार केले हे सत्य आहे. याकडे पाटील यांनी लक्ष वेधले. पाटील म्हणाले ,चंदगड विधानसभा मतदारसंघ  राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे असताना तेथे उमेदवारी कोणाला द्यायची हा पक्षांतर्गत बाब आहे. मात्र चंदगड विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बदला म्हणून वेगळी आघाडी उघडण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत तो त्वरित थांबवावा. राष्ट्रवादीच्या उमेदवाराबद्दल बोलण्याचा अधिकार बाकीच्यांना कोणी दिला. राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असावा हे पक्षाचे नेते ठरवतील असेही पाटील यांनी सांगितले.
 पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नव्हता. मुश्रीफ यांच्या कालावधीत कधीच पक्षाचा जिल्ह्यात विस्तार झाला नव्हता.  उलट गेल्या दीड वर्षांमध्ये जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील व शहराध्यक्ष आर के पोवार यांच्या नेतृत्वाखाली जुन्या नव्यांची सांगड घालून जिल्ह्याच्या बारा तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्ष उभा करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केला आहे. शरद पवार पक्षाची प्रत्येक तालुक्यात आज 25 ते 30 हजार मते आहेत. ज्यांना कोणाला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्ह्यात अस्तित्व नाही असे वाटते त्यांनी कोल्हापूर जिल्हामध्ये मैत्रीपूर्ण लढत करण्याची हिंमत ठेवा म्हणजे कोण किती पाण्यात आणि कोण किती पाण्यावर आहे हे कळेल
 पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष आर के पोवार, पद्मा तिवले, युवक राष्ट्रवादीचे रोहित पाटील, निरंजन कदम, सुनील देसाई अनिल घाटगे, रामराजे बदाले, आप्पा हजारे, श्रीकांत पाटील, संजय शिंदे, गणेश जाधव, महंमद महात , मोहन कांबळे, संतोष मेंगाने, गौरव पनोरेकर आदी उपस्थित होते