+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही !
Screenshot_20240226_195247~2
schedule06 Aug 22 person by visibility 1352 categoryगुन्हे
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
महाराष्ट्र महसूल न्याय प्राधिकरणात सुरू असलेल्या खटल्याचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावण्यासाठी कोल्हापूर येथे पोलीस कर्मचाऱ्यांने एक कोटीची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. जॉन वसंत तिवडे रा.कोरोची ता. हातकणंगले असे लाच मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.
पोलिसांनी या कारवाईची माहिती दिली. तक्रारदार हा पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील देहुगावचा असून तक्रारदाराचे महाराष्ट्र न्याय प्राधिकरणाकडे जमिनीच्या संदर्भात तीन खटले सुरू आहे. तक्रारदाराला 22 फेब्रुवारी रोजी एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला.त्या व्यक्तीने तुमचे महाराष्ट्र न्याय प्राधिकरणाच्या पिठासनासमोर खटले चालू असून प्राधिकरणातील माने साहेब माझ्या ओळखीचे आहेत. या खटल्याचा निकाल तुमच्या बाजूने लावण्यासाठी तिवडे याने तक्रारदाराकडेत एक कोटी रुपयांची लाच मागितली.
 त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली .त्यानंतर पोलिसांनी लाचेची खातरजमा केली. मध्यवर्ती बस स्थानकाजवळील हॉटेल सुबरायाजवळ पोलीस कर्मचारी जॉन तिवडे याने सरकारी पंचाच्या उपस्थितीत तक्रारदाराकडे एक कोटी रुपये लाच मागितली. त्यानंतर पोलिसांनी पुरावे गोळा करून पोलीस कर्मचारी जॉन तिवडे याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे अधिकारी या गुन्ह्याचा सखोल तपास करणार आहेत.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधिक्षक आदिनाथ बुधवंत, पोलीस नाईक विकास माने , सुनील घोसाळकर , मयूर देसाई , रुपेश माने यांनी या कारवाईत भाग घेतला.