+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे.
Screenshot_20240226_195247~2
schedule24 Apr 24 person by visibility 56 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :  काेल्हापूर महापालिकेतर्फे २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी परवाना फीमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. अग्निशमन विभागाच्या फीमध्ये तीन वर्षे कोणतीही वाढ केलेली नव्हती.  यंदा  २०२४-२५ मध्ये नवीन परवानाधारकांना अग्निशमन फीमध्ये दहा टक्के व जुन्या परवानाधारकांना पाच टक्के वाढ करण्यात आलेली आहे. परंतु व्यापारीवर्गामध्ये सरसकट परवाना व अग्निशमन फीमध्ये वाढ केली असल्याचे गैरसमजातून तक्रारी आल्या आहेत. चालु वर्षीच्या परवाना फीमध्ये तांत्रीक कारणामुळे गतवर्षीपेक्षा काही व्यापा-यांना वाढ आलेस ही बाब परवाना विभागाच्या निदर्शनास आणून दयावी.  तक्रार आलेस तात्काळ परवाना विभागाकडून तपासणी अंती व्यापाऱ्यांच्या परवाना फीमध्ये दुरुस्ती करुन देण्यात येईल. याबाबत उप-आयुक्त साधना पाटील व व्यापारी प्रतिनिधी यांची महापालिकेत संयुक्त बैठक होऊन महापालिका व व्यापा-यांच्यात समन्वय ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तरी व्यापा-यांनी लवकरात लवकर परवाना फी भरुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.