+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ
Screenshot_20240226_195247~2
schedule22 Aug 22 person by visibility 466 categoryजिल्हा परिषद
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश, आमदार प्रकाश आवाडेंची माहिती
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्ह्यातील भटक्या जमाती क प्रवर्गातील व धनगर समाजाच्या कुटुंबासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत या योजनेअंतर्गत 17 मार्च 2020 रोजी  जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 176 लाभार्थ्यांना घरकुल योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती, मात्र गेले दोन वर्ष या लाभार्थ्यांना कागदोपत्रीच मंजुरी मिळाली होती त्यांना राज्य शासनाकडून मंजूर घरकुलाचे अनुदान अद्याप ही वितरित करण्यात आले नव्हते, याबाबतीत आमदार प्रकाशआवाडे याांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस  यांना निवेदन देऊन सोबत मंजुरी यादी ही दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ संबंधित विभागाला कोल्हापूर जिल्ह्यातील मंजूर झालेल्या 176 घरकुलांचे निधी तात्काळ वितरित करण्यात यावा असा आदेश दिला आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत शिरोळ, हातकणंगले ,भुदरगड, आजरा, या तालुक्यातील भटक्या जमाती क प्रवर्गातील व धनगर समाजातील लाभार्थ्यांच्या खात्यावरती लवकरच निधी जमा होवून प्रत्यक्षात घरकुल बांधकामास आता सुरुवात होणार आहे, या योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या प्रशासकीय मान्यता मिळालेल्या सर्व घरकुलांचा निधी तात्काळ वितरित करण्यात यावा असा आदेश या राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित विभागास दिले आहेेत. ल्हा