+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण
Screenshot_20240226_195247~2
schedule15 Jan 23 person by visibility 921 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीसाठी रविवारी अतिशय चुरशीने मतदान झाले. सोसायटीच्या २५२६ सभासद मतदारांपैकी २४३८ जणांनी मतदानाचा हक्क बजावला.
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीसाठी  श्री महालक्ष्मी सहकार सत्तारुढ पॅनेल आणि विरोधी राजर्षी शाहू स्वाभिमानी आघाडी यांच्यामध्ये थेट लढत झाली. २१ जागेसाठी ४२ उमेदवार रिंगणात होते.
 यंदाची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला. उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत बिनविरोधसाठी प्रयत्न झाले.मात्र जागा वाटपावरून दोन्ही पॅनेलमध्ये एकमत झाले नाही. गेले आठवडाभर दोन्ही पॅनेलच्या प्रमुख नेतेमंडळीमध्ये आरोप- प्रत्यारोप झाले. त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. दोन्ही पॅनेलमधील चुरशीचे प्रत्यंतर रविवारी प्रत्यक्ष मतदाना दिवशी आले. सकाळी आठ ते सायंकाळी पाच अशी मतदानाची वेळ होती. दोन्ही पॅनेलच्यावतीने सभासद मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी वाहनांची सोय केली होती. दिवसभर दोन्ही पॅनेलचे प्रमुख श्री शहाजी कॉलेज येथील मतदान केंद्र परिसरात होते. श्री महालक्ष्मी सहकार सत्तारुढ पॅनेलचे नेतृत्व सोसायटीचे माजी चेअरमन एम. आर. पाटील, विद्यमान चेअरमन राजीव परीट, विद्यमान संचालक महावीर सोळांकुरे, आरोग्य कर्मचारी संघटनेचे एम. एम. पाटील, शिक्षक संघटनेचे नेते राजाराम वरुटे, ज्योतीराम पाटील, रवी पाटील, ग्रामसेवक संघटनेचे के आर किरुळकर आदींनी केले.
[विरोधी पॅनेलचे नेतृत्व आघाडीप्रमुख सचिन जाधव, मार्गदर्शक ए.व्ही.कांबळे, सुभाष इंदुलकर, प्रकाश देसाई, उमेदवार एस.ए. गायकवाड, शिक्षक नेते ए.के.पाटील, पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील आदींनी नेतृत्व केले. दोन्ही पॅनेलने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मतदाना दिवशी सभासदांचा उत्साह दिसून येत होता. चुरशीने मतदान झाले. सोमवारी (१६ जानेवारी) मतमोजणी होणार आहे.