+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही !
Screenshot_20240226_195247~2
schedule15 Jan 23 person by visibility 401 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर : "कोल्हापूर जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेच्या निवडणुकीत सभासद, मतदारांनी मोठ्या विश्वासाने श्री महालक्ष्मी राजर्षी शाहू आघाडीकडे सत्ता सोपवली. पतसंस्थेच्या निवडणुकीत आघाडीच्या सतरा उमेदवारावर विश्वास व्यक्त करत निवडून दिले. सभासदाने दाखविलेला विश्वास नक्कीच सार्थ ठरवू. गट- तट न पाहता ग्रामसेवक हा केंद्रबिंदू मानून काम करू. निवडणुकीच्या काळात जी आश्वासने दिली त्याचे नक्की पूर्तता करू" अशी ग्वाही श्री महालक्ष्मी राजर्षी शाहू आघाडीचे नेते साताप्पा मोहिते व के. आर. किरुळकर यांनी  दिली.
 साताप्पा मोहिते म्हणाले, " निवडणुकीच्या प्रचार कालावधीत सभासदांचा मोठा प्रतिसाद मिळत होता. एन.के. कुंभार यांच्या भ्रष्ट कारभाराला सभासद वैतागले होते. त्यांच्या मनमानी कारभारामुळे संघटनेची वाताहत झाली.ही बाब सभासदांच्या लक्षात आली. सभासदाने मतदानाच्या माध्यमातून कुंभार यांच्या एकाधिकारशाहीला झिडकारले."
 के. आर. किरुळकर म्हणाले, " एन. के.कुंभार यांच्या स्वार्थी कारभारावर सभासदांचा रोष होता. सभासदांनी मतांच्या रूपातून तो व्यक्त केला. आम्ही सभासद हिताचा कारभार करू. सभासदांना सन्मानाची वागणूक, सभासदांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज, सभासदांना कमी व्याज दरात कर्जाची उपलब्धता आणि ठेवीवर आकर्षक व्याजदर यासह सभासद हिताच्या योजनांची अंमलबजावणी केली जाईल."    श्री महालक्ष्मी-राजर्षी शाहू आघाडीच्या विजयात सर्व ग्रामसेवक सभासदांचे योगदान आहे. या निवडणुकीत आघाडीच्या विजयासाठी काकासाहेब पाटील, अजित राणे, एन.एस इंगळे, दयानंद मोटुरे, सागर सरावणे, सचिन गुरव यांच्यासह आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी समर्थकांनी व सभासदांनी प्रयत्न केले. त्यामुळे हा विजय शक्य झाला अशा भावनाही व्यक्त केल्या. या निवडणुकीत श्री महालक्ष्मी राजर्षी शाहू आघाडीने श्री शिवशाहू आघाडीचा पराभव केला. १७ पैकी १७ जागा जिंकल्या.
.....................................
 सभासदांनी दिलेला कौल मान्य
 "ग्रामसेवक पतसंस्थेच्या निवडणुकीत सभासदांनी जो कौल दिला आहे तो मान्य आहे. निवडणुकीत सभासद मतदारांनी जी मदत केली त्याविषयी आभार मानतो. येथून पुढे संघटना मजबूत करण्याचे काम करणार आहे. ग्रामसेवकांच्यासाठी काम करत राहणार.मात्र ज्यांनी संघटनेशी फारकत घेतली, गद्दारी केली त्यांच्याशी कधीही जवळीक करणार नाही."अशी प्रतिक्रिया श्री शिवशाहू आघाडीचे नेते एन. के‌. कुंभार यांनी व्यक्त केली