माजी आमदार दिनकरराव जाधव यांचे निधन
schedule14 Dec 24 person by visibility 214 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राधानगरीचे माजी आमदार व बिद्री सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिनकरराव भाऊसाहेब जाधव यांचे शनिवारी (चौदा डिसेंबर) सायंकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाने काँग्रेसचा एक ज्येष्ठ नेता हरपला. सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी नाळ जुळलेला नेता होता अशा शब्दात हळहळ व्यक्त होत आहे.
[ दिनकरराव जाधव 1978 मध्ये काँग्रेसतर्फे राधानगरी मतदारसंघातून निवडून आले होते. शिवाय बिद्री कारखान्याचे चेअरमन म्हणून काम करताना त्याने शेतकरी हिताच्या योजनांना प्राधान्य दिले होते. रविवारी (15 डिसेंबर) सकाळी 11 वाजता भुदरगड तालुक्यातील तिरवडे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.