+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustदादा, वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा ! आपल्या मार्गदर्शनाने जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मिळतेय प्रेरणा ! ! adjustआपली उमेदवारी फाइनल, शिवसेनेतर्फे २८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार-राजेश क्षीरसागर adjustजीएसटी अधिकाऱ्याला २५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले adjustउत्तम संवाद कौशल्य म्हणजे उत्तम करिअरची संधी- डॉ विश्वनाथ मगदूम adjustजिल्ह्यातील हॉटेल, बार, दारु दुकाने रात्री अकरानंतर बंद ! जिल्हा प्रशासनाचा आदेश adjustप्रत्येक निवडणुकीत कोल्हापूर दक्षिणमध्ये मतदानाचा चढता आलेख ! नवीन २६ मतदान केंद्रे !! adjustइचलकरंजी भाजपा कार्यालयात आवाडेंचे उत्साही स्वागत ! शशिकला जोल्ले, सुरेश हाळवणकरांनी केले स्वागत !! adjustजिल्हा परिषद कर्मचारी महासंघातर्फे आढावा बैठक adjustकरवीर तालुका शिक्षक-शिक्षकेतर पतसंस्थेतर्फे सभासदांना दीपावली भेट वस्तू वाटप adjustकोल्हापूर दक्षिणची जनता माझ्यासोबत ! निवडणुकीत नक्की पाठीशी राहील !! अमल महाडिक
1001157259
1001130166
1000995296
schedule20 Oct 24 person by visibility 795 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. शिवाजी रघुनाथ तथा एस. आर. पाटील यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रविवारी (२० ऑक्टोबर) दुपारी निधन झाले. मृत्यूसमयी ते ६९ वर्षाचे होते. ते मूळचे सांगलीवाडी, सांगली येथील आहेत.
 शिवाजी विद्यापीठातून ते २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात निवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर प्रा. पाटील हे संजय घोडावत युनिव्हर्सिटी येथे कार्यरत होते. सध्या ते, मोरेवाडी परिसरात वास्तव्यास होते. रविवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागले. पत्नींने त्यांना तत्काळ रिक्षामधून खासगी हॉस्पिटलकडे घेऊन गेले. दरमया एसएससी बोर्डजवळ असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी, प्रा. पाटील यांचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांना सांगितले. त्यांच्यावर सोमवारी सकाळी ९ वाजता सांगलीवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे.