+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ
Screenshot_20240226_195247~2
schedule19 Jan 23 person by visibility 261 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :" कोल्हापूर महान्पालिकेतील इस्टेट विभागामध्ये इस्टेट ऑफिसरांच्या नेतृत्त्वाखालीअनागोंदी कारभार सुरू आहे. यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे." या आशियाचे निवेदन कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने उपायुक्त रविकांत अडसूळ यांना दिले.
 निवेदनात म्हटले आहे, "ई वॉर्ड शाहू कॉलेज परिसरात फूटपाथ भाडे कराराने दिल्याचे समजते. फूटपाथ भाड्याने देता येतो का ? शिरोली टोल नाक्यानजीक जुन्या जकात नाक्याच्या
इमारती शेजारी मंगल कार्यालयासाठी महापालिकेच्या पार्किंगसाठी राखीव असणाऱ्या २१/२ एकर जागेतील दर्शनी भाग विना परवाना, विना मोबदला दिला
आहे. तो देता येतो का ? त्याच ठिकाणी गेली ३ वर्षे नागरिक तक्रार करतात की काही लोकांनी वहिवाटीचा रस्ता मुरुम, दगड माती टाकून बंद  आहे. तो खुला करुन नागरिकांची धोकादायक गैरसोय दूर करावी यावर काहीच कार्यवाही केली जात नाही.
महापालिकेच्या अनेक जागेत अतिक्रमण केले आहे व त्या ठिकाणी अनेक व्यवसाय केले जातात. त्यामुळे महापालिकेची इस्टेट वापरुन इतर लोक पैसे कमवितात. त्यात महापालिकेचा आर्थिक तोटा होत आहे. इस्टेट विभागाच्या वतीने अतिक्रमण निर्मुलन मोहीम काढून नुसताच फार्स केला जातो. "   महापालिकेचे जलतरण तलाव चालू केले. स्तुत्य उपक्रम आहे. पण त्याचे दरपत्रक जाहीर केलेले नाही. शासनाचा तलावात पोहण्याचा दर ४५ मिनीटांसाठी ५० रुपये. असताना (महापालिका फक्त पंधरा रुपये अशी अल्पशा फी आकारून महापालिकेचे आर्थिक नुकसान केले जात आहे याच तलावावर सायंकाळी पाच ते सहा या वेळेत महिलांना पोहण्याची बॅच असताना सायं,5ते 8या वेळेत इतर लोकांना कसा तलाव वापरण्यास देतात इतर संस्थांनी ठराविक बॅच जादा फी भरुन खेळाडूंना वापरण्यास देण्याचा महापालिकेस प्रस्ताव दिला असता तो वरिष्ठांपर्यंत न पाठवता मधेच प्रलंबित ठेवून
महापालिकेचे आर्थिक नुकसान करीत आहेत.
     शिष्टमंडळात अंकुश कदम, राजू मालेकर, लहुजी शिंदे, दीपक मोहिते, जलराज कदम अजिंक्य कदम, सुरेश कदम,  शंकरराव शेळके, इस्माईल गाडेवाल, अशोक पोवार, रमेश मोरे, प्रकाश रांगणेकर, राजाराम कांबळे, चंद्रकांत पाटील आदींचा सहभाग होता.