+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustदादा, वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा ! आपल्या मार्गदर्शनाने जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मिळतेय प्रेरणा ! ! adjustआपली उमेदवारी फाइनल, शिवसेनेतर्फे २८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार-राजेश क्षीरसागर adjustजीएसटी अधिकाऱ्याला २५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले adjustउत्तम संवाद कौशल्य म्हणजे उत्तम करिअरची संधी- डॉ विश्वनाथ मगदूम adjustजिल्ह्यातील हॉटेल, बार, दारु दुकाने रात्री अकरानंतर बंद ! जिल्हा प्रशासनाचा आदेश adjustप्रत्येक निवडणुकीत कोल्हापूर दक्षिणमध्ये मतदानाचा चढता आलेख ! नवीन २६ मतदान केंद्रे !! adjustइचलकरंजी भाजपा कार्यालयात आवाडेंचे उत्साही स्वागत ! शशिकला जोल्ले, सुरेश हाळवणकरांनी केले स्वागत !! adjustजिल्हा परिषद कर्मचारी महासंघातर्फे आढावा बैठक adjustकरवीर तालुका शिक्षक-शिक्षकेतर पतसंस्थेतर्फे सभासदांना दीपावली भेट वस्तू वाटप adjustकोल्हापूर दक्षिणची जनता माझ्यासोबत ! निवडणुकीत नक्की पाठीशी राहील !! अमल महाडिक
1001157259
1001130166
1000995296
schedule20 Aug 24 person by visibility 11582 categoryगुन्हे
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :  ४५ हजार रुपयांची लाच घेताना अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. अन्नसुरक्षा अधिकारी विकास रोहिदास सोनवणे (वय ५०, वर्षे, रा. लाईफ स्टाईल अपार्टमेंट, प्रतिभानगर, कोल्हापूर . मुळ गाव रा. राशीन, ता.कर्जत, जि. अहमदनगर) असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. मंगळवारी २० रोजी कारवाई करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईची माहिती दिली. या गुन्ह्यातील तक्रारदाराचे वेफर्स आणि नमकीन या खाद्यपदार्थ तयार करण्याच्या प्रकल्प आहे. या प्रकल्पाला अन्नसुरक्षा अधिकारी सोनवणे यांनी पाच ऑगस्ट रोजी भेट देऊन तपासणी केली आणि काही खाद्यपदार्थ सॅम्पल म्हणून घेऊन गेले. ताब्यात घेतलेल्या अन्नपदार्थांच्या आणि खाद्यपदार्थांच्या नमुन्यामध्ये कोणताही दोष नाही अशी कारवाई न करणेसाठी तसेच फर्मचे लायसन रद्द न करणेसाठी अन्नसुरक्षा अधिकाऱ्याने तक्रारदाराकडे ४५ हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारदाराच्या तक्रारीची खातरजमा करून पोलिसांनी आज मंगळवारी सापळा रचला तक्रारदाराकडून ४६ हजार रुपयांची लाच घेताना पोलिसांनी अन्नसुरक्षा अधिकारी सोनवणे याला रंगेहाथ पकडले. संशयित अधिकारी सोनवणे यांच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक बापु साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार
प्रकाश भंडारे, हेड कॉन्स्टेबल विकास माने, सुनील घोसाळकर, सुधीर पाटील, संगीता गावडे,सचिन पाटील
यांनी कारवाई केली.