+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustवारणा विद्यापीठ - टेलर्स युनिव्हर्सिटी मलेशिया यांच्यामध्ये सामंजस्य करार adjustग्रंथ जगण्याची प्रेरणा देतात - समीर देशपांडे adjustकृष्णराज महाडिक उगवता सूर्य, आज ना उद्या नक्की दिवस उगवणार ! अपेक्षा न करता, आपण काम करत करायचं !! adjustकेएमसी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन adjustप्रख्यात भूलतज्ज्ञ डॉ. शकील मोमीन यांना जीवनगौरव पुरस्कार, केएमएतर्फे वीस ऑक्टोबरला वितरण adjustजितो कोल्हापूरचा पदग्रहण समारंभ दिमाखात ! अध्यक्षपदी रवी संघवी, मुख्य सचिवपदी अनिल पाटील, खजानिसपदी सिताराम कोरडे !! adjustकोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे दोन दिवसीय केएमए-कॉन परिषद adjust दूध विक्रीत गोकुळचा नवा उच्चांक , कोजागिरीनिमित्त 18 लाख 65 हजार लिटर दूध विक्री adjustकोरे अभियांत्रिकीतील प्राध्यापकांना भारत सरकारचे कॉपीराईट नोंदणी प्रमाणपत्र adjustदेशमुख शिक्षण समूहात विजेत्या शिक्षकांचा सत्कार
1001130166
1000995296
schedule08 Jun 24 person by visibility 1134 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष व शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे यांच्या पत्नी नवोदिता घाटगे यांची तोतया अधिकाऱ्यांनी वीस लाख रुपयांची आर्थिफ फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. मलेशियात पाठविण्यासाठी दिलेल्या पार्सलमध्ये अंमल पदार्थ व बनावट पासपोर्ट असल्याचे सांगत बोगस कस्टम अधिकारी व सीबीआय अधिकाऱ्यांनी वीस लाख रुपयांचा गंडा घातला आहे.यासंबंधी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तीन संशियातवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन ते पाच जून २०२४ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. दोन जून रोजी नवोदिता घाटगे यांना मोबाइल करुन तुम्ही मलेशियात पाठविण्यासाठी जे पार्सल दिले होते, त्यामध्ये तुमच्या नावाचे बनावट पासपोर्ट, एटीएम कार्ड व अंमल पदार्थ आहे. आम्ही कस्टम अधिकारी आहोत. तुमच्या विरोधात कायदेशींर कारवाई होऊ शकते असे सांगण्यात आले. आणखी एका फोनवरुनही सीबीआयचे अधिकारी असल्याचे सांगत भिती घालण्यात आली. कारवाई टाळायची असेल तर पैसे द्यावे लागतील असे सांगत तब्बल वीस लाख रुपये ऑनलाइन पाठवावयास सांगितले. फसवणूक झाल्याचे कळताच घाटगे यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.