निर्यातदारांसाठी जिल्हा उद्योग केंद्रात होणार एक्स्पोर्ट सेल
schedule20 Dec 24 person by visibility 34 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘‘ उद्योजक आणि नव उद्योजकांसाठी महाराष्ट्र सरकारच्या विविध सवलत आणि सबसिडीच्या योजना आहेत त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्र कोल्हापूरचे महाव्यवस्थापक अजयकुमार पाटील यांनी केले. गेल्या अनेक वर्षापासूनची उद्योजकांची मागणी असलेली निर्यातदारांसाठी एक्स्पोर्ट सेल येत्या काही दिवसात जिल्हा उद्योग केंद्र येथे सुरू करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित केलेल्या ‘‘उद्योगांसाठी असलेल्या महाराष्ट् शासनाच्या विविध योजना व धोरणाबाबत आयोजित केलेल्या चर्चासत्रात बोलत होते.उद्योग उपसंचालक अनमोल कोरे यांनी मुख्यमंत्री रोजगार योजना व पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेची माहिती दिली. व्यवस्थापक विकास कुलकर्णी यांनी सामूहिक प्रोत्साहन योजनेबाबतची माहिती दिली
जिल्हा उद्योग पुरस्कार हे दरवर्षी उत्कृष्ट उद्योजकांना दिले जातात यासाठी दि.31 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज करावेत असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष बाबासो कोंडेकर यांनी केले. जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा असून यापोर्टलवर अर्ज करावेत असे आवाहन उपाध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांनी केले.
असोसिएशनचे सचिव प्रसन्न तेरदाळकर यांनी आभार मानले. याप्रसंगी श्रीकांत दुधाणे, हिंदूराव कामते, विश्वजित सांवत, दिलावर शेख, अजित कोठारी, प्रतिक प्रधान,नंदकुमार नलवडे, ऋग्वेदा माने, रेश्मा माने, संगिता नलवडे, चंद्रमोहन परब, मंदार आरवाडे, हर्षवर्धन धोत्रे, नियती देशमुख, गडवाले,ओंकार सावंत, प्रदीप व्हरांबळे, प्रशांत मोरे उपस्थित होते.