प्रत्येक दिवस नारीशक्तीचाच - रोहिणी आबिटकर
schedule10 Mar 25 person by visibility 31 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : मुलींना बालपणापासूनच आत्मरक्षणाचे धडे मिळावेत आणि महिलांनी स्वतःच्या हक्कांसाठी जागरूक राहावे. महिला दिन हा केवळ एकच दिवस नसून प्रत्येक दिवस हा नारिशक्तीच्या सन्मानाचा आहे, असे मत जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रोहिणी आबिटकर यांनी व्यक्त केले. शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयामध्ये महिला दिनाच्या कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या. “समाजातील प्रत्येक महिलेला सुरक्षित वातावरण मिळाले पाहिजे, आणि महिलांची मानसिकता बदलण्याची गरज आहे असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील होत्या.
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी स्वतःचे ध्येय ठरवा, त्या क्षेत्रातील आदर्श डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल करा आणि यशस्वी व्हा. आपल्या देशाला आणि राज्याला असंख्य कर्तुत्वान महिलांची परंपरा लाभली आहे, त्यांचे आभार मानावे तितके कमीच आहेत. त्याच आदर्शाच्या जोरावर आजच्या या युवतींनी समाजापुढे आपला आदर्श निर्माण व्हावा, असे कर्तुत्व करायला हवे. आणि तुमच्याकडे कर्तुत्व असेल तर जग तुमचे नेतृत्व स्वीकारातेच असा प्रेरणादायी संदेश ॲड. अंबिका पाटील यांनी दिला.
आपला नजरिया बदला दुसऱ्याच्या नजरा बदलतील असे मत पालकरवाडीच्या उपसरपंच दीपाली पालकर यांनी व्यक्त केले. या महिला दिनाच्या कार्यक्रमांमध्ये कार्यरत माता पालक यांचा सत्कार करण्यात आला. मुंबई पोलीस मध्ये निवड झालेल्या पूजा बारड, प्रियांका बाचणकर , साक्षी गोरुले, सुहानी कांबळे या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. मल्टिनॅशनल कंपनीमध्ये निवड झालेल्या ऋतुजा गाडीवड्ड , श्रेया सुतार, साक्षी अस्वले, नीलम मोरेया विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. साक्षी गुरव यांनी सूत्रसंचालन केले प्रा. शुभांगी भारमल यांनी आभार मानले. यावेळी उपप्राचार्य सागर शेटगे, प्रा. दिग्विजय कुंभार,प्रा. विशाल कांबळे, प्रा. स्नेहल माळी प्रा. काजल बलुगडे,प्रा. सिद्धता गौड,प्रा. गायत्री पाटील उपस्थित होत्या.