जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांचे कामकाजाचे मूल्यांकन !
schedule18 Dec 24 person by visibility 67 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांच्या कामकाजाचे गुणांकन करण्यात येत आहे. त्यांच्याकडील एकूण कामकाजाच्या मुद्यावर १४० गुणांचे गुणांकन होणार आहे. यंदा केलेल्या गुणांकनानुसार राधानगरी तालुका ८६.५७ गुणांसह प्रथम, कागल तालुका ८६.४५ गुणासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. करवीर तालुक्याला ७६.५२ सर्वात कमी गुण मिळाले आहेत.
जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा पद्धतीने गुणांकन केले असून याच नुसार गटविकास अधिकारी यांच्या कामगिरीचे वार्षिक मूल्यांकन केले जाणार आहे. दरम्यान अन्य तालुक्यांचे गुणांकन भुदरगड - 86.26, गगनबावडा - 83.78 , शिरोळ - 83.27, हातकणंगले - 81.58, शाहूवाडी - 80.96, आजरा – 79, चंदगड - 76.66, पन्हाळा - 77.68, गडहिंग्लज - 77.94 इतके गुणे आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हास्तरीय खातेप्रमुख व जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, तालुकास्तरीय खातेप्रमुखांची सभा झाली.
मंगळवारी जवळपास दहा तास बैठक झाली. यामध्ये विकासात्मक प्रशासन आणि तालुका स्तरीय यंत्रणेची विविध योजनांच्या अंमलबावणीमध्ये असणारी भूमिका आणि करावयाची कर्तव्ये या बाबत सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, प्रकल्प संचालक श्रीमती सुषमा देसाई व जिल्हास्तरीय सर्व खाते प्रमुख आणि तालुक्याचे सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते.