+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustदादा, वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा ! आपल्या मार्गदर्शनाने जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मिळतेय प्रेरणा ! ! adjustआपली उमेदवारी फाइनल, शिवसेनेतर्फे २८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार-राजेश क्षीरसागर adjustजीएसटी अधिकाऱ्याला २५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले adjustउत्तम संवाद कौशल्य म्हणजे उत्तम करिअरची संधी- डॉ विश्वनाथ मगदूम adjustजिल्ह्यातील हॉटेल, बार, दारु दुकाने रात्री अकरानंतर बंद ! जिल्हा प्रशासनाचा आदेश adjustप्रत्येक निवडणुकीत कोल्हापूर दक्षिणमध्ये मतदानाचा चढता आलेख ! नवीन २६ मतदान केंद्रे !! adjustइचलकरंजी भाजपा कार्यालयात आवाडेंचे उत्साही स्वागत ! शशिकला जोल्ले, सुरेश हाळवणकरांनी केले स्वागत !! adjustजिल्हा परिषद कर्मचारी महासंघातर्फे आढावा बैठक adjustकरवीर तालुका शिक्षक-शिक्षकेतर पतसंस्थेतर्फे सभासदांना दीपावली भेट वस्तू वाटप adjustकोल्हापूर दक्षिणची जनता माझ्यासोबत ! निवडणुकीत नक्की पाठीशी राहील !! अमल महाडिक
1001157259
1001130166
1000995296
schedule19 Oct 24 person by visibility 101 categoryउद्योग
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  'कोल्हापूरच्या उद्योजकांनी स्वतःच्या ताकदीवर कोल्हापूरचा विकास केला. उद्योगामुळे देशाच्या विकासाला चालना मिळणार आहे. यासाठी जिल्ह्याचा विकास गरजेचा आहे. विविध उद्योगांमुळेच कोल्हापूरचा विकास झाला असून, कोल्हापूरकरांनी साधलेली प्रगती अभिमानास्पद आहे', या शब्दात माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी स्तुतीसुमने उधळली. 
   निमित्त होतं, शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूरच्या (स्मॅक)  ४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे. याप्रसंगी प्रभू यांनी विकास व्हाया उद्योग, माहिती तंत्रज्ञान, पर्यटन, कृषीपूरक उद्योग आणि समाज सहकार्य या विषयावर मांडणी केली.'स्मॅक'चे अध्यक्ष सुरेन्द्र जैन अध्यक्षस्थानी होते. हॉटेल पॅव्हेलियन मधील मधुसूदन सभागृहात कार्यक्रम झाला. स्मॅकचे उपाध्यक्ष जयदीप चौगले, बदाम पाटील, भरत जाधव  यांची प्रमुख उपस्थिती होती. 
प्रभू पुढे म्हणाले, सध्या उद्योग व सेवा क्षेत्रात झपाट्याने बदल होत असून, नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. मॅन्युफॅक्चरिंग वाढत नाही, तोपर्यंत विकास होत नाही. अधिक औद्योगिकीकरणामुळे कमी रोजगार निर्मिती होईल, हे एक मोठे आव्हान आहे. परंतु उद्योजकांनी भविष्यासाठी आवश्यक गोष्टींचे उत्पादन सुरू करण्याची गरज आहे.
  सुरेन्द्र जैन  यांनी  सुरेश प्रभू हे रेल्वेमंत्री असताना कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्ग व नागरी वाहतूक मंत्री झाल्यानंतर कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णय घेतले असे नमूद केले. कोल्हापूरला निर्मिती क्षेत्रातील मोठा उद्योग यावा, यासाठी सुरेश प्रभू यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी जैन यांनी प्रभू यांच्याकडे केली. 
उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या सभासद उद्योजकांचा 'स्मॅक भूषण पुरस्कारा'ने गौरव केला यामध्ये संरक्षण क्षेत्रातील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पुरवठा साठी मे. एनजेम टेक्नॉलॉजिस प्रा. लि. चे डायरेक्टर राहुल व गौतम उपळेकर, कास्टिंग व्यतिरिक्त औद्योगिक निर्यातदार म्हणुन मे. खुशबू इंजिनियर्स च्या प्रोप्रायटर पूजा सामाणी व सीईओ अजित सामाणी व आयात पूरक किंवा नवीन उत्पादना साठी मे. अॅडरॉईट इंजिनियर्सचे टेक्निकल डायरेक्टर आय. ए. पाटील यांचा समावेश होता. स्मॅकचे कायदेशीर सल्लागार अॅड. अशोक उपाध्ये यांचाही सन्मान झाला.
 स्मॅक, केईए, गोशिमा, मॅक, सीआयआय, आयआयएफ, कोल्हापूर चेंबर, आयटी, बार असोसिएशन, फौंड्री क्लस्टर, केएचएमएस, केएमए, क्रीडाई या संघटनांच्या वतीने सुरेन्द्र जैन, बाबासो कोंडेकर, स्वरूप कदम, मोहन कुशिरे, अजय सप्रे, विनय खोबरे, संजय शेटे, अॅड. सर्जेरावखोत, के. पी. खोत, विजय कोराणे, विठ्ठल पाटील यांनी सुरेश प्रभू यांचा कोल्हापूरच्या विकासासाठी दिलेला योगदानाबद्दल मानपत्र प्रदान केले.
कार्यक्रमास 'स्मॅक'चे माजी अध्यक्ष पद्माकर सप्रे, आर. बी. थोरात, एम. वाय. पाटील, राजू पाटील, अतुल पाटील, संचालक प्रशांत शेळके, नीरज झंवर, सुरेश चौगुले, रणजित जाधव, शेखर कुसाळे, शेखर कुसाळे, स्वीकृत संचालक राहुल कात्रुट, निमंत्रित सदस्य अनिल दटमजगे, अमित गांधी, उदय साळोखे, दादासाहेब दुधाळ, सुभाष अतिग्रे, जयंतीलाल शहा, विनय लाटकर, अमोल कोंडेकर, जयसिंग पाटील, प्रकाश चरणे, दीपक घोंगडी, प्रकाश खोत, संजय भगत, किरण चव्हाण, प्रसन्न आळवेकर, पी. आर. घाटगे तसेच हरिश्चंद्र धोत्रे, नितीचंद्र दळवाई, प्रदीपभाई कापडिया, विज्ञानंद मुंडे, उद्योजक चंद्रशेकर डोली, नेमचंद संघवी, सचिन शिरगावकर, वरून जैन, दिपक जाधव, नामदेव पाटील, महिला उद्योजिका बिना जनवाडकर, जिया झंवर, सुश्मिता सप्रे, राजसी जाधव-सप्रे, अधिक्षक, धर्मादाय सह आयुक्त शिवराज नाईकवाडे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख, कार्यकारी अभियंता आय. ए. नाईक आदी उपस्थित होते.