एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार, दिल्लीत 11 फेब्रुवारीला पुरस्कार वितरण
schedule08 Feb 25 person by visibility 129 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. येत्या मंगळवारी (११ फेब्रुवारी) दिल्लीत माजी केंद्रीय मंत्री आणि दिल्लीत होत असलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.५ लक्ष रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि शिंदेशाही पगडी असे पुरस्काराचे स्वरुप आहे.केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, जेष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे आणि पद्मभूषण राम सुतार यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील. नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.सरहद, पुणे आयोजित अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित याच कार्यक्रमात दिल्लीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींचा गौरव केला जाणार आहे, अशी माहिती, सचिन ईटकर, वैभव डांगेआणि लेशपाल जवळगे यांनी दिली. कार्यक्रमाच्या पूर्वी मराठी अभंगांसाठी प्रसिद्ध सरहद च्या शमिमा अख्तर यांच्या अभंग गायनाचा तसेच मराठी गीत गायनाचा कार्यक्रम असणार आहे.