दुधगंगा उजवा मुख्य कालव्याच्या दोन्ही तीरावरील भागामध्ये पाणी उपसाबंदी
schedule26 Apr 23 person by visibility 228 categoryजिल्हा परिषद
: दुधगंगा उजवा मुख्य कालव्याच्या दोन्ही तीरावरील भागामध्ये तसेच दुधगंगा नदी व कालवा भागात मिळणाऱ्या सर्व ओढे व नाल्यावरील पाणी फुगीच्या दोन्ही तीरावरील भागामध्ये शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसायंत्रावर उपसाबंदी करण्याचे आदेश पाटबंधारे विभाग (उत्तर) चे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिले आहेत.
उपसाबंदी क्षेत्र पुढीलप्रमाणे- दुधगंगा नदी (धरणस्थळ ते दत्तवाड को.प.बंधारा)- दि. 30 एप्रिल ते 1 मे 2023 असे 2 दिवस, दुधगंगा उजवा मुख्य कालवा (लिंगाचीवाडी ते बिद्री कालवा दुभाजक) - दि. 30 एप्रिल ते 1 मे 2023 असे 2 दिवस व दुधगंगा डावा कालवा ( धरण ते पिंपळगाव ता. कागल) - दि. 30 एप्रिल ते 1 मे 2023 असे दोन दिवस पाणी उपसांबदी राहील.
उपसाबंदी कालावधीत अनाधिकृत उपसा आढळून आल्यास संबंधित उपसायंत्र जप्त करुन परवाना धारकाचा उपसा परवाना एक वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येईल व होणाऱ्या नुकसानीस पाटबंधारे खाते जबाबदार राहणार नाही, असेही श्री. बांदिवडेकर यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
00000