जिल्हा पशुसंवर्धन अधिकारीपदी डॉ. प्रमोद बाबर ! डॉ. विनोद पवार यांची बदली !!
schedule14 May 23 person by visibility 392 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार यांची सातारा जिल्हा परिषदेकडे बदली झाली आहे. त्यांच्या रिक्त जागी डॉ. प्रमोद बाबर यांची नियुक्ती झाली आहे. दरम्यान पवार यांनी कोल्हापुरातील चार वर्षाच्या कालावधीत पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहचविल्या. महापूर आणि लम्पीची साथ या कालावधीत उत्कृष्ट काम केले. पशुवैद्यकीय विभागाच्या योजना ग्रामीण भागात पोहोचाव्यात यासाठी प्रयत्न केले.