महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शुक्रवार पेठ बुरुड गल्ली येथील हनुमान सेवा मंडळातर्फे देवशयनी आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भाविकांना ७० किलो खिचडी राजगिरा लाडूचे वाटप करण्यात आले. बुधवारी पहाटे साडेपाच वाजता विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीवर भाविकांच्या उपस्थितीमध्ये अभिषेक करण्यात आला. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मंदिर पहाटे साडेपाच ते रात्री साडेदहा वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहणार आहे.