+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ
Screenshot_20240226_195247~2
schedule22 Nov 22 person by visibility 310 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर संघटना आणि वेणूताई यशवंतराव चव्हाण होमिओपॅथिक कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने देवदूत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. डॉ.अरुण भस्मे अध्यक्षस्थानी होते. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे कार्यक्रम झाला.
पुणे येथील डॉ. राजेंद्र जगताप यांनी मार्गदर्शन केले.अपघातग्रस्त परिस्थितीमध्ये मदत करताना सर्वप्रथम आपण सुरक्षित आहोत का, रुग्ण नेमका कोणत्या कारणाने बेशुद्ध पडला आहे हे कसे ओळखायचे, गोंधळून न जाता १०८ नंबरला फोन करणं, कोणतेही अद्यावत वैद्यकीय उपकरण सोबत नसताना रुग्णाचा श्वास आणि हृदय कसे सुरू करायचे याचे प्रात्यक्षिक दाखविले. याशिवाय सर्पदंश, श्वासनलिकेत वस्तू अडकून श्वास गुदमरणे, इलेक्ट्रिक शॉक लागणं, पाण्यामध्ये बुडलेल्या व्यक्तीला मदत यासंबंधी मार्गदर्शन केले. डॉ. राजेंद्र जगताप यांनी ' प्री हॉस्पिटल इमर्जन्सी मेडिकल केयर' हा कोर्स लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले.
 डॉ. नितीन बेलनेकर यांनी स्वागत केले. अध्यक्ष डॉ. श्यामप्रसाद पावसे यांनी प्रास्ताविक केले.डॉ. डॉ. प्रिया दंडगे यांनी सूत्रसंचालन केले.श्रीकांत लंगडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला सनराइजचे चेअरमन संदीप चव्हाण, डॉ. जयवंत पाटील, डॉ. वीरधवल मोरे, डॉ. महेश पाटील, डॉ. संदीप पाटील, डॉ. गिरीश कोरे, डॉ. स्नेहल पाटील, डॉ. विशाल सावंत, डॉ. सागर माने, डॉ. प्राची महाजन, डॉ. मोनाली सुभेदार, डॉ. मनोज भोपळे उपस्थित होते.