+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण
Screenshot_20240226_195247~2
schedule01 Dec 22 person by visibility 318 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
मेंदूची शस्त्रक्रिया झालेला कोल्हापुरातील नामवंत फुटबॉलपटू निखील खाडे हा बरा होईपर्यतची उपचाराची सर्व जबाबदारी डी. वाय. पाटील ग्रुप उचलेल अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यानी दिली.
 त्यांनी, तज्ज्ञ डॉक्टरांसह कुटुंबियांसोबत नातेवाइकांशी निखीलवरील उपचाराबाबत सविस्तर चर्चा केली. डॉ. संजय डी. पाटील आणि आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी. वाय. पाटील ग्रुप निखिलच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने सव्वा लाख रुपयांची मदत निखिलच्या वडिलाकडे देण्यात आली.
कोल्हापुरातील ख्यातनाम फुटबॉल खेळाडू आणि दिलबहार तालीम मंडळाचा गोलरक्षक निखिल खाडे याच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. गुरुवारी आमदार पाटील यांनी निखिलच्या प्रकृतीबाबत चर्चा केली.
यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, प्राचार्य डॉ.महादेव नरके रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे, डी. डी. पाटील, मेंदू तज्ञ डॉ. उदय घाटे, दिलीप खाडे, अॅड. अभिजित नलवडे, पवन पाटील, अजित पाटील, प्रा.योगेश चौगले, विराज पसारे, अर्जुन पोवाळकर, अक्षय भोसले, आदी उपस्थित होते.
…………………..
निखिलला मानसिक आधार देऊया
कोल्हापूर ही क्रीडा नगरी असून फुटबॉल हा येथील श्वास आहे. सर्वाचा लाडका फुटबॉलपटू निखिल खाडेच्या पाठीशी डी. वाय. पाटील ग्रुप भक्कमपणे उभा आहे. मात्र, या काळात त्याला खरी गरज आहे ती मानसिक आधाराची. त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी सर्वांनी प्रार्थना करूया. तसेच प्रोत्साहित करून त्याला मानसिक बळ देऊया. आपल्या सर्वांच्या सदिच्छा निखिलला निश्चितपणे या संकटातून बाहेर काढण्यासाठी बळ देतील.
-ऋतुराज पाटील, आमदार कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ