केआयटीच्या आठ विद्यार्थ्यांची कंपनीत निवड
schedule30 May 23 person by visibility 349 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
कोल्हापूर अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागातील आठ विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर पंपचे उत्पादन काम करणाऱ्या केएसबी पंप या अग्रमानांकित कंपनीमध्ये निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्यामध्ये प्रणव पाटील,सनीराज कासार, दीपक कडतरे, तेजस बंडूके,गझल मोमीन गणेश सदरे ,विपुल गोखले आणि स्वरूप पाटील या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
कंपनीच्या निवड प्रक्रियेमध्ये पहिल्या राऊंडमध्ये ६६ विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षा उत्तीर्ण केली.त्यातील २५ विद्यार्थ्यांनी ग्रुप ऍक्टिव्हिटी पूर्ण केली. त्यातील १८ विद्यार्थ्यांनी सायकोमेट्रिक टेस्ट यशस्वीरित्या पूर्ण केली. एकूण १५ विद्यार्थी हे तांत्रिक व एच.आर. मुलाखतीसाठी निवडले गेले.या कंपनीने विद्यार्थ्यांना ४.५ लाखाचे वार्षिक पॅकेज घोषित केलेले आहे.
संस्थेचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली ,सचिव दीपक चौगुले, कार्यकारी संचालक डॉ.व्ही.व्ही. कार्जिन्नी, संचालक डॉ. मोहन वनरोट्टी, रजिस्ट्रार डॉ.एम.एम.मुजुमदार यांनी वरील विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलेले आहे. मध्यवर्ती ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी डॉ.अमित सरकार ,मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख डॉ.उदयसिंह भापकर यांचे प्रोत्साहन या विद्यार्थ्यांना मिळाले. मेकॅनिकल विभागाचे प्रा.प्रसाद मुतालिक, प्रा.प्रवीण गोसावी,प्रा.आशिष पाटील, प्रा.निलेश देसाई यांनी मार्गदर्शन केले.