इनरव्हील क्लबतर्फे बसथांब्याची उभारणी, मंगळवारी लोकार्पण सोहळा
schedule05 Jun 26 person by visibility 40 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूरच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सोन्या मारुती चौक येथे बस थांबा उभारला आहे. या बसथांब्याचे लोकार्पण मंगळवारी (9 जून 2026) सकाळी १०.३० वाजता होणार आहे. अशी माहिती क्लबच्या अध्यक्षा रुक्मिणी हेगिष्टे व इव्हेंट चेअरमन रुपाली बाड यांनी दिली. इंटरनॅशलन इनरव्हील ट्रेझरर डॉ. रश्मी शर्मा यांच्याहस्ते व महापौर रुपाराणी निकम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा होत आहे. हा बसथांबा प्रकल्प, क्लबच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातील महत्वपूर्ण उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला डॉ. विद्या पठाडे, डॉ. विद्युत शहा, दीपा जाधव उपस्थित होते.