४२७ दूध संस्थेसंबंधी सतेज पाटील गटातर्फे सर्किट बेंचमध्ये याचिका
schedule05 Jun 26 person by visibility 26 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी ४२७ दूध संस्थांना मतदानासाठी अपात्र ठरविण्याच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाला सर्किट बेंचमध्ये आव्हान दिले आहे. आमदार सतेज पाटील गटातर्फे चार संस्थांनी याचिका दाखल केली आहे. करवीर तालुक्यातील जय जवान जय किसान दूध संस्था, राधानगरी तालुक्यातील कौलव येथील महिला सहकारी दूध संस्था, आवळी बुद्रुक येथील कै. दिनकरराव आ. कवडे दूध संस्था आणि हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव येथील सुरभी सहकारी दूध संस्थांनी अॅड. श्रीकृष्ण गणबावले यांच्या माध्यमातून ही याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती रणजितसिंह राजा भोसले यांच्या कोर्टात ही याचिका दाखल आहे. यावर पुढील सुनावणी सोमवारी, आठ जून २०२६ रोजी होणार आहे.