Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
भाऊसिंगजी रोडवरील जिपच्या मालकीच्या जागा विकसित करा - सभापती सारिका नांदेकर४२७ दूध संस्थेसंबंधी सतेज पाटील गटातर्फे सर्किट बेंचमध्ये याचिकाइनरव्हील क्लबतर्फे बसथांब्याची उभारणी, सोमवारी लोकार्पण सोहळाप्रचाराचा धडाका, सेलिब्रिटीज मैदानात…महामंडळाचे राजकारण जोरातशाहू सांस्कृतिक सभागृह पाडण्याच्या प्रस्तावाला विरोध - नाथाजी पाटीलरविकिरण इंगवलेंचे आमदारपुत्रावर आरोप, ऋतुराज क्षीरसागरांचाही पलटवारनवीन आयकर कायदा चार्टर्ड अकौंटंटसनी सामान्य नागरिकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवावा - सीए मंगेश किनारेडॉ. जयसिंगराव पवार यांना यंदाचा राजर्षी  शाहू पुरस्कार जाहीरडीवाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला एनबीए टीएर-१ वाशिंग्टन ॲकॉर्ड मानांकनसतेज - ऋतू केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धा रविवारी , प्रथम क्रमांकाचे बक्षीस महिंद्रा ट्रॅक्टर

जाहिरात

 

प्रचाराचा धडाका, सेलिब्रिटीज मैदानात…महामंडळाचे राजकारण जोरात

schedule05 Jun 26 person by visibility 26 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कलाकार, गायक, निर्मात, दिग्दर्शक, तत्रंज्ञ म्हणून मराठी सिनेमाचा पडदा गाजविणारी ही मंडळ आता प्रत्यक्ष निवडणुकीत उतरुन प्रचाराचा धडाका लावला आहे. सभासदांच्या भेटीगाठी, मेळावे आणि आरोप, प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे राजकारण भलतेच जोरात आहे.

सत्ताधारी समर्थ पॅनेल  विरोधात चित्रकर्मी पॅनेल अशी थेट लढतीची चिन्ह आहेत. तब्बल दहा वर्षानंतर चित्रपट महामंडळाची निवडणूक होत आहे. गेल्या दहा वर्षाचा कारभार दोन्ही पॅनेलच्या केंद्रस्थानी आहे. सत्ताधारी समर्थ पॅनेलचे नेतृत्व माजी अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अभिनेता सुशांत शेलार, संजय ठुबे, धनाजी यमकर करत आहेत. तर चित्रकर्मी पॅनेलमध्ये दिग्दर्शक सतीश रणदिवे, अभिनेता आनंद काळे, निर्माता विजय शिंदे, गणेश तळेकर, रणजीत जाधव ही मंडळी आघाडीवर आहेत. बिनविरोध निवडून आलेल्या अभिनेत्री वर्षा उसगावकर, महामंडळाचे माजी अध्यक्ष विजय पाटकर हे चित्रकर्मी पॅनेलच्या प्रचारात आघाडीवर आहेत.

सत्ताधारी समता पॅनेलने सभासदांसाठी राबविलेल्या विविध योजना, कोरोना कालावधीतील मदत यावर फोकस करत आहेत. चित्रकर्मी पॅनेलने सत्ताधाऱ्यांच्या कालावधीतील महामंडळाच्या मोडल्या ठेवी, कर्मचाऱ्यांची बंद पेन्शन यावरुन वाभाडे काढण्यास सुरूवात केली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली येथे दोन्ही आघाडयांनी सभासदांचे मेळावे घेतले. पॅनेलची भूमिका मांडली आहे. महामंडळाच्या कामकाजावरुन आता वैयक्तिक  आरोपपर्यत प्रचार पोहोचला आहे.

…………….

अपक्षांचेही आव्हान, वैयक्तिक संपर्कावर भर

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत सोळा अपक्ष उमेदवार आहेत. यापैकी आठ अपक्ष उमेदवारांनी एकत्र येत महामंडळ बचाव आघाडी केली आहे. अभिनेता संतोष शिंदे, अवधूत जोशी, मानसिंग कदम, महादेव शिरोळकर, शरद लोणकर, मनोज मराठे, उल्हास नांद्रे यांचा महामंडळ बचाव आघाडीत समावेश आहे. कोल्हापूरचे कलादिग्दर्शक सुनील घोरपडे, नृत्य दिग्दर्शक संग्राम भालकर हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. या अपक्ष उमेदवारांनी थेट संपर्कावर भर दिला आहे. सभासदांशी भेटीगाठी घेत आहेत.

…………………………..

रविवारी मतदानपाच केंद्रावर मतदानाची सुविधा

रविवारी, सात जून २०२६ रोजी मतदान आहे. राज्यभरातील ३४०३ सभासद मतदार आहेत. १४ जागांसाठी ४४ उमेदवार रिंगणात आहेत. कोल्हापूर केंद्रातील तीन बूथवर ७४५ सभासद, पुणे केंद्रावरील दोन बूथवर ७२४, सोलापूर केंद्रातील एका बूथवर १४६, मुंबईतील पाच बूथवर १५६९, नाशिक केंद्रातील एका बूथवर २१९ सभासद मतदार आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes