+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ
Screenshot_20240226_195247~2
schedule21 Jan 23 person by visibility 255 categoryक्रीडा
खेलो इंडिया गर्ल्स लिग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
न्यू पॅलेस पोलो मैदानावर भारतीय प्राधिकरण खेलो इंडिया अंतर्गत १७ वयोगट मुलींच्या फुटबॉल लिग स्पर्धेस सुरुवात झाली. छत्रपती वॉरियर्स, रियल टच संघांनी प्रतिस्पर्धी संघावर मात करत विजयी सलामी दिली.ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या मार्गदर्शनानुसार कोल्हापूर स्पोटर्स असोसिएशनच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्घाटनानंतर पहिला सामना छत्रपती वॉरियर्स आणि एस थ्री ऍकॅडेमी यांच्यामध्ये झाला. हा सामना छत्रपती वॉरियर्स संघाने 6-1 गोलफरकाने जिंकला. स्वरांजली सावंतने चौथ्या मिनिटाला गोल करत संघाचे खाते खोलले. त्यानंतर जान्हवी ढेरेने चार गोल नोंदवले. जान्हवीने सातव्या, तेराव्या, ३६ व्या आणि ४८ मिनिटाला गोलची नोंद केली. चंदना भेंडेकरने 75 व्या मिनिटाला गोल केला.
श्री काडसिद्धेश्र्वर हायस्कूल व उषाराजे गर्ल्स हायस्कूल यांच्यामधील झालेला दुसरा सामना 1-1 गोल बरोबरीत राहिला. काडसिद्धेश्र्वरच्या दिया पोवारने 17 व्या तर उषाराजेच्या अवनी उत्तूरकरने 30 व्या मिनिटाला गोल केला.
रिअल टच फुटबॉल अॅकॅडेमी व भाई माधवरावजी बागल हायस्कूल यांच्यामध्ये होऊन हा सामना रिअल टच संघाने 3-1 गोलफरकाने जिंकला. मधुरिमा भोसलेने सहाव्या व 39 व्या मिनिटाला, तर आर्या देशपांडेने 29 व्या मिनिटांला गोल केला. बागल हायस्कूलच्या ऋतुजा आवळेने 24 व्या मिनिटाला गोल नोंदविला
तत्पुर्वी स्पर्धेचे उद्घाटन ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन महिला समिती सदस्या व वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या महिला समिती चेअरमन मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी के.एस.ए.चे सचिव, माणिक मंडलिक, फुटबॉल सचिव राजेंद्र दळवी. नंदकुमार बामणे व कार्यकारिणी सदस्य प्रदीप साळोखे उपस्थित होेते.
या लिग अंतर्गत एकूण 30 सामने होणार असून प्रत्येक दिवशी तीन सामने याप्रमाणे एकूण दहा दिवस लिग सामने होणार आहेत. 17 फेब्रवारी, 2023 पर्यंत सामने खेळवले जाणार आहेत.