जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये रंगली बुद्धिबळ स्पर्धा
schedule05 Feb 25 person by visibility 663 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये बुद्धिबळ स्पर्धा रंगली. वसंतराव नाईक सभागृह येथे स्पर्धा झाली. अधिकारी व कर्मचारी मिळून १८० जणांचा सहभाग होता. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करुन स्पर्धेचे उद्घाटन झाले.
या स्पर्धेंतर्गत १८ ते ३५ वर्षे वयोगट, ३६ ते ४५ वर्षे वयोगट व ४६ ते ६० वर्षे वयोगटात स्पर्धा झाल्या. कंत्राटी कर्मचाऱ्यांचा खुला गट खेळविणेत आला. पुरुष १८ ते ३५ वर्षे वयोगटामध्ये असिफ सय्यदने प्रथम, वैभद गुट्टेने व्दितीय व चिंतामणी कारजगेने तृतीय क्रमांक पटकविला. ३६ ते ४५ या वयोगटामध्ये सचिन मानेने प्रथम, विनायक सुतारने व्दितीय व मुरलीधर कुंभारने तृतीय क्रमांक पटकविला. ४६ ते ६० या वयोगटमध्ये सुभाष भोसलेने प्रथम, प्रशांत गायकवाडने व्दितीय व सुनिल व्हटकरने तृतीय क्रमांक पटकविला,
महिला गटामध्ये १८ ते ३५ वयोगटात समिक्षा पाटील प्रथम, तेजस्विनी टिपुगडे व्दितीय, दिक्षा ओहळानी तृतीय क्रमांक पटकविला. वयोगट ३६ ते ४५ मध्ये सुप्रिया घोरपडे प्रथम, राजश्री काकतकर व्दितीय व मनिषा कांबळेनी तृतीय क्रमांक पटकविला. वयोगट ४६ ते ६० मध्ये मनिषा देसाई प्रथम, शुभांगी कार्वेकर व्दितीय व अर्चना खाडेनी तृतीय क्रमांक पटकविला.
त्यानंतर कंत्राटी पुरुष मध्ये राहूल जावडे प्रथम, शरद जाधव व्दितीय तर गजानन कुलकर्णीनी तृतीय क्रमांक पटकविला. कंत्राटी महिला कर्मचारी मध्ये सायली पाटील प्रथम, संमृध्दी पाटील व्दितीय, कविता माळीनी तृतीय क्रमांक पटकविला. कर्मचारी बरोबर अधिकारी यांनीही या खेळाचा आनंद घेतला.पंच म्हणून भरत चौगुले, मनिष मारुलकर व आरती मोदी यांनी काम पाहिले. या बुध्दीबळ स्पर्धेचे नियोजन प्रसाद बोरकर, प्रज्योत कुंभार, सुशांत सुर्यवंशी , स्वप्नील पाटील, अदित्य पोवार व सागर जाधव यांनी केले .यानंतर दहा फेब्रवारी रोजी सायकल व ११ फेब्रुवारी २०२५ रोजी व्हॉलिबॉल स्पर्धा (पुरुष) होणार आहे.