+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust शाहू छत्रपतींनी मानले आभार, जनतेच्या पाठिंब्यामुळे विजय निश्चित ! adjustमतदान केंद्रावर हाणामारी, महायुती-महाविकासचे कार्यकर्ते भिडले adjustचुरशीने मतदान, जिल्हयात अकरा वाजेपर्यंत 23 टक्के मतदान adjust मतदान केंद्रासाठी पथके रवाना, मतदानासाठी ३९८६ मतदान केंद्र सज्ज adjustअधिकाऱ्यांची संकल्पना, जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवर मतदान केंद्रांची स्थापना ! adjustमुंबईत राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन adjustलोकराजाला करवीरच्या जनतेकडून अभिवादन ! adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार
Screenshot_20240226_195247~2
schedule08 Mar 24 person by visibility 135 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : साईक्स एक्सटेंशन परिसरात पिसाळलेला माकडाला अग्निशमन विभाग व वन विभागाच्या वतीने पकडण्यात आले. गुरुवारपासून राजारामपुरी परिसरात एक माकड नागरिकांच्या अंगावर धावून येत होते याबाबत अग्निशमन विभागाला फोन आल्यानंतर तातडीने त्याला पकडण्यासाठी जवान गेले होते.
 रात्री या माकडाला पकडण्याचा प्रयत्न अग्निशमन विभागाच्या वतीने करण्यात आला होता परंतु अंधार असल्याने त्याला पकडता आले नाही. शुक्रवारी सकाळी साईक्स एक्सटेन्शन या परिसरात एका नागरिकाला पिसाळलेले माकड चावले असल्याचा फोन अग्निशमन विभागाला आला. यावेळी अग्निशमन विभागाने तात्काळ त्या ठिकाणी गाडी पाठवून त्या माकडाला पकडण्याचा प्रयत्न केला. 
यावेळी या पिसाळलेल्या माकडाला अग्निशमन विभाग व वन विभाग यांनी थँक्यू लायझरचे इंजेक्शनद्वारे व जाळीच्या साह्याने या माकडाला पकडले. यानंतर त्याला सुखरूप दाजीपूर अभयारण्यात सोडण्यासाठी नेण्यात आले. या मोहिमेत महानगरपालिका अग्निशमन विभागातील स्थानक अधिकारी जयवंत खोत वाहन चालक नवनाथ साबळे फायरमन-प्रमोद मोरे व संभाजी ढेपले व वन विभागाचे अमोल चव्हाण, विनायक माळी, काटकर प्रदीप सुतार- पथक प्रमुख बांगी, माझी उपमहापौर संजय मोहिते व इचलकरंजी वन्य जीव संरक्षक संस्था हजार होते.