Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर फर्स्ट पोहोचले दिल्लीत ! केंद्रीय मंत्र्यांच्यासोबत रेल्वे- रस्ते- पर्यटनासंबंधी चर्चा !!सुर्यकांत पाटलांचा बाजार समिती सभापतिपदाचा राजीनामा, राजकीय संन्यासाची घोषणा शिवाजीराव कदमांचे स्मारक विधायक कार्यासाठी प्रेरणादायी ! गणेश पतसंस्थेच्या प्रांगणात पुतळयाचे अनावरण !!कृष्णराज महाडिक दिल्लीत, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची घेतली भेट करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शन व्यवस्थेत बदल ईद फेस्टिव्हलचे मंगळवारी उद्घाटनमहापालिकेच्या अंदाजपत्रकात कोणतीही व्यावसायिक वाढ  नाही - सत्ताधारी नगरसेवकांची व्यावसायिकांना ग्वाहीवरिष्ठ शिक्षकांना टीईटीमधून सूट द्यावी, खासदार धनंजय महाडिकांची संसदेत मागणीकुलगुरुपदासाठीच्या अर्जांचे शॉर्टलिस्ट, २५ जणांची यादी तयार ! एप्रिलमध्ये मुलाखती ! !जिल्हा परिषदेत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

जाहिरात

 

हद्दवाढ दृष्टीक्षेपात,  तत्वत: मान्यता-आमदार राजेश क्षीरसागर

schedule17 Jun 25 person by visibility 800 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ कोल्हापूरच्या हद्दवाढीच्या दृष्टीने आजचा दिवस हा अंत्यत महत्वपूर्ण आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार व दोन्ही सचिव यांनी साधारणता हद्दवाढीला तत्वत:  मान्यता  दिली आहे.’अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने,  राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी खासदार संजय मंडलिक, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजीत कदम यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. या बैठकीत क्षीरसागर यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी हद्दवाढ अत्यावश्यक असल्याचे नमूद केले. हद्दवाढ करताना ग्रामीण भागातील जनतेला विश्वासात घेण्याच्या सूचनाही बैठकीत झाल्या. 

बैठकीनंतर  क्षीरसागर यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ‘आजच कोल्हापूर  महापलिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांना हद्दवाढीचा प्रस्ताव सरकारला सादर करण्याविषयकी पत्र देत आहे. तो प्रस्ताव त्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवतील. मुख्य कार्यकारी अधिकारी,  संबंधित गावांना त्यांचे ठराव मागतील. संबंधित ग्रामपंचायती हद्दवाढीसंबंधीचा ठराव अनुकूल किंवा प्रतिकूल देतील. त्यानंतर प्रस्ताव सरकारकडे सादर होईल. त्यावर सरकार निर्णय घेईल. त्यानंतर गेली अनेक वर्षे रखडलेल्या हद्दवाढीच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. हद्दवाढ दृष्टीपथात आली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना विश्वासात घेऊन लवकरच हद्दवाढ होईल.कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसून जिल्ह्यात एकत्र राहणारी मंडळी जिल्हयाच्या विकासाची गरज ओळखून हद्दवाढीसाठी सकारात्मक राहिले पाहिजेत.’

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes