जिल्हा परिषदेत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
schedule12 Mar 26 person by visibility 29 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पिंपळे यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीत यशवंतराव चव्हाण यांनी दिलेल्या योगदानाची आठवण करून त्यांना आदरांजली अर्पण केली.याप्रसंगी जिल्हा परिषदेचे विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन शिक्षिका सुषमा पाटील यांनी केले