Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कृष्णराज महाडिक दिल्लीत, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची घेतली भेट करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शन व्यवस्थेत बदल ईद फेस्टिव्हलचे मंगळवारी उद्घाटनमहापालिकेच्या अंदाजपत्रकात कोणतीही व्यावसायिक वाढ  नाही - सत्ताधारी नगरसेवकांची व्यावसायिकांना ग्वाहीवरिष्ठ शिक्षकांना टीईटीमधून सूट द्यावी, खासदार धनंजय महाडिकांची संसदेत मागणीकुलगुरुपदासाठीच्या अर्जांचे शॉर्टलिस्ट, २५ जणांची यादी तयार ! एप्रिलमध्ये मुलाखती ! !जिल्हा परिषदेत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनएलआयसीचे निवृत्त अधिकारी नंदकुमार जाधव यांचे निधन हरिप्रिया एक्स्प्रेसमधील कमी केलेल्या प्रवासी डब्यांची संख्या पूर्ववत करा- परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव ॲक्शन मोडवर, वर्कशॉपची केली पाहणी

जाहिरात

 

कृष्णराज महाडिक दिल्लीत, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची घेतली भेट

schedule13 Mar 26 person by visibility 23 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : भाजप युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी नवी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या यांची भेट घेतली. पक्ष संघटन, युवकांचे प्रश्‍न, संघटनात्मक रचना याबद्दल कृष्णराज यांनी या वरिष्ठ नेत्यांकडून माहिती घेतली. तसेच युवा मोर्चाची वाटचाल कशा पध्दतीने असावी, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन घेतले.

भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी  महाडिक यांची निवड झाली. त्यानंतर त्यांनी दुसर्‍या दिवसापासून संघटनेच्या कामकाजाला सुरवात केली. गेल्या तीन दिवसांपासून कृष्णराज महाडिक नवी दिल्लीत आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या यांची कृष्णराज यांनी भेट घेतली. त्यांच्याकडून  महाडिक यांनी विविध विषयांवर माहिती जाणून घेतली. युवा वर्गाचे प्रश्‍न, पक्षीय संघटन, युवकांच्या अपेक्षा, भाजपची विचारधारा आणि युवा मोर्चाचा विस्तार या अनुषंगाने कृष्णराज महाडिक यांनी भाजपच्या दोन्ही वरिष्ठ नेत्यांकडून मार्गदर्शन घेतले. जास्तीत जास्त युवकांना भाजपचे सदस्यत्व देणे, युवापिढीसाठी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करणे, यासह अनेक मुद्दयांवर कृष्णराज यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष  नबीन आणि युवा मोर्चा अध्यक्ष सुर्या यांच्याशी चर्चा केली. कृष्णराज यांच्या निवडीबद्दल तसेच भविष्यकालीन वाटचालीसाठी भाजपच्या दोन्ही नेत्यांनी शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes