Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सुर्यकांत पाटलांचा बाजार समिती सभापतिपदाचा राजीनामा, राजकीय संन्यासाची घोषणा शिवाजीराव कदमांचे स्मारक विधायक कार्यासाठी प्रेरणादायी ! गणेश पतसंस्थेच्या प्रांगणात पुतळयाचे अनावरण !!कृष्णराज महाडिक दिल्लीत, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची घेतली भेट करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शन व्यवस्थेत बदल ईद फेस्टिव्हलचे मंगळवारी उद्घाटनमहापालिकेच्या अंदाजपत्रकात कोणतीही व्यावसायिक वाढ  नाही - सत्ताधारी नगरसेवकांची व्यावसायिकांना ग्वाहीवरिष्ठ शिक्षकांना टीईटीमधून सूट द्यावी, खासदार धनंजय महाडिकांची संसदेत मागणीकुलगुरुपदासाठीच्या अर्जांचे शॉर्टलिस्ट, २५ जणांची यादी तयार ! एप्रिलमध्ये मुलाखती ! !जिल्हा परिषदेत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनएलआयसीचे निवृत्त अधिकारी नंदकुमार जाधव यांचे निधन

जाहिरात

 

सुर्यकांत पाटलांचा बाजार समिती सभापतिपदाचा राजीनामा, राजकीय संन्यासाची घोषणा

schedule14 Mar 26 person by visibility 106 categoryराजकीय

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी  : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यकांत पाटील यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिला आहे तसेच त्यांनी राजकीय संन्यास घेण्याचे ही घोषित केले . मी आयुष्यभर पक्ष निष्ठेने काम केले, संघर्ष केला मात्र माझ्या बाबत खरे खोटे तपासले गेले नाही हीच माझ्या मनातील मोठी खंत आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. रविवारी 15 मार्च रोजी मंत्री हसन मुश्रीफ यांना भेटून ते आपली भूमिका मांडणार आहेत तसेच येथे चार दिवसांमध्ये जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सभापती पदाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. सूर्यकांत पाटील हे मंत्री मुश्रीफ यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. 
राजकीय आयुष्याच्या चाळीसहून अधिक वर्षात अनेक पदे सांभाळूनही वैयक्तिक अपेक्षा न  ठेवता पक्ष वजनतेसाठी काम केले असा दावा पाटील यांनी केल.  तसेच बाजार समितीमध्ये सभापती म्हणून काम करताना शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले. बाजार समितीचे उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून धोरणात्मक निर्णय घेतले. मात्र त्या कामावरुन चुकीची माहिती नेत्यांच्या पर्यंत पोहोचवली जात असल्याची खंत व्यक्त केली. बाजार समितीमधील काही संचालक आपल्या कामाविषयी कायम तक्रार करत होते. मात्र आपण कोणताही स्वार्थ न ठेवता बाजार समितीचे कामकाज केले. माझ्याबद्दलच्या तक्रारी झाल्या त्यामुळे मी आता बाजार समितीत नव्हे तर सर्व संस्थांमधील पदांचाही राजीनामा देण्याचा आपण निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. विकास सेवा सोसायटी,  दूध संस्था,  बाजार समिती आणि सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना अशा सर्व संस्थांमधील पदांचा राजीनामा देण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे.नैसर्गिकरित्या राजीनामा देणे वेगळे असते आणि कोणाच्या सांगण्यावरून राजीनामा मागितले जाणे वेगळे असते त्यामुळे सर्व पदांचा राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेण्यापर्यंत आपण पोहोचलो आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी त्यांनी कदाचित बळी दिल्यानंतरच किंमत कळते जर तसे असेल तर बळी  जायची तयारी ठेवली आहे असे भावनिक वक्तव्य त्यांनी केले. बाजार समितीच्या इतिहासात चेअरमनपद स्वीकारल्यानंतर अवघ्या सात महिन्यात राजीनामा देण्याचा निर्णय घेणारे ते पहिलेच चेअरमन ठरले आहेत. काही जणांना पदाला चिकटून राहण्यात आनंद असतो मात्र पदापेक्षा स्वाभिमान मोठा असल्याचे त्यांनी नमूद केले. 
 बाजार समितीत मी केलेल्या कामाचा लेखाजोखा तपासण्यापूर्वी काही जणांकडून चुकीची माहिती देऊन माझ्यावर आरोप केले. त्याची शहानिशा न करताच नेते मंडळींनी अनपेक्षित वागणूक दिली. बाजार समितीचे उत्पन्न वाढले पाहिजे यासाठी समितीच्या कार्यालया पाठीमागे रिकाम्या जागेत व्यापारी संकुल उभा करण्याचा आराखडा तयार केला होता. तीन मजली इमारतीच्या साह्याने प्रचंड उत्पन्नात वाढ झाली असती केवळ गाड्यांच्या  माध्यमातून दहा कोटी उत्पन्न मिळाले असते. वेगवेगळी कार्यालय या ठिकाणी निर्माण झाले असते. हा निर्णय बाजार समितीच्या हिताचा होता मात्र आराखडा पुढे हा निर्णयही गेला नाही. लोक नेत्यांना भेटतात, मग नेते मंडळी तुझे काम बरोबर नाही असा शेरा देतात हे बरोबर नाही असे वाटते. मी चेअरमन झाल्यानंतर काही संकल्प केले होते. शाहू सांस्कृतिक सभागृह अत्याधुनिक करण्याचा मानस होता यासाठी निविदा मागितल्या. भाडेतत्त्वावर देण्याचा आणि सांस्कृतिक सभागृहाला वैभव प्राप्त करून देण्याचा विषय होता. हे सभागृह ताब्यात घेताना पूर्वीच्या भाडेकरूचे भाडे हे वार्षिक एक लाख रुपये होते. नंतर आम्ही टेंडर काढले अनेकानी टेंडर भरलेत. त्यामध्ये मासिक भाडे कोणी पाच लाख,देतो कोणी तीन लाख देतो असे म्हणाले. मात्र अजय  देसाई यांनी  पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये भाडे  आणि जीएसटी मिळून जवळपास सहा लाख रुपये देतो असे टेंडर भरले. शिवाय पावणेदोन कोटी रुपये डिपॉझिट होतो असे सांगितले. त्यांचे टेंडर पास करण्यात आले नंतर इमारत पाडायचे नाही असे ठरले तेही मान्य केले. मात्र नेते मंडळींचे काहींनी कान भरले, त्यांनाच का? असा प्रश्न समोर आला.कदाचित हा निर्णय आवडला नाही का?असा प्रश्नही माझ्या मनात येत आहे. केवळ बाजार समितीचे भले आणि उत्पन्न वाढीसाठी आपण प्रयत्न केला होता असेही पाटील यांनी सांगितले. मी राजकीय संन्यास घेत असलो तरी मंत्री मुश्रीफ आणि माझ्यामध्ये जे नाते आहे त्यामध्ये  कधी अंतर पडणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes