भालचंद्र चिकोडे ग्रंथालयात यावर्षी उच्चांकी ८९७ रक्तदात्यांचा सहभाग
schedule02 Dec 24 person by visibility 62 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भालचंद्र चिकोडे ग्रंथालयतर्फे आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रविवारी, एक डिसेंबर रोजी झालेल्या रक्तदान शिबिरात ८९७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यंदा उच्चांकी रक्तदान झाल्याबद्दल संयोजक राहुल चिकोडे यांचे मान्यवरांनी कौतुक केले.
दरम्यान रक्तदान शिबिराप्रसंग्ी आमदार राजेश क्षीरसागर , राहुल आवाडे, अशोक माने, माजी आमदार जयश्री जाधव, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैय्या माने, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सत्यजीत कदम, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास यांनी भेट दिली. हॉटेल व्यावसायिक सचिन शानभाग,उज्वल नागेशकर, वास्तु विशारद संजय आडके, आर्किटेक्ट जीवन बोडके, उद्योजक नितीन भांबुरे, बापू कोंडेकर , पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, डॉ. आदित्य प्रभावळे, डॉ. भूषण मिरजे, डॉ. प्रफुल्ल वाळके , न्यु एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रभाकर हेरवाडे, राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक सागर बगाडे, माजी नगरसेवक संदीप कवाळे, चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय शेटे, संजय पवार, सन्मती मिरजे, प्रमोद पाटील, हर्षदीप घाटगे, यांच्यासह विविध मान्यवरांनी भेटी दिल्या.
शिबिर यशस्वीतेसाठी ग्रंथालयाच्या वतीने सचिन साळोखे, जयदीप मोरे, योगेश चिकोडे, मधुरीमा चिकोडे, आशिष बामणे, कृष्णात आतवाडकर, अजिंक्य अहिरे, विवेक कुलकर्णी, प्रीतम यादव, विजय अगरवाल, सुमित पाटील, ओंकार खराडे, अतुल चव्हाण, प्रथमेश पिष्टे, अभिजित यादव, सिद्धू पिसे, श्रीधर साळोखे यांनी विशेष परिश्रम घेतले.