+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा !
Screenshot_20240226_195247~2
schedule29 May 23 person by visibility 263 categoryराजकीय
कोल्हापूर लोकसभा तालुका अध्यक्षांसाठी ३० मे रोजी, हातकणंगले मतदारसंघातील तालुकाध्यक्षासाठी पाच जून मुलाखती
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतीय जनता पक्षांमध्ये सध्या संघटनात्मक बदलाचे वारे आहेत. कोल्हापूर महानगर, कोल्हापूर जिल्हा ग्रामीण आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हाध्यक्षपदासाठी मुलाखती झाल्या. या पदासाठी निवडीची घोषणा व्हायची आहे. दरम्यान कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात समाविष्ठ तालुका भाजपा अध्यक्षपदासाठी निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रत्येक तालुकाध्यक्षाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे. ज्या तालुकाध्यक्षांचे काम समाधानकारक नाही त्या ठिकाणी बदल होणार आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ठ तालुका भाजपा अध्यक्षांची निवडीसाठी ३० मे २०२३ रोजी मुलाखती होणार आहेत.हातकणंगले लोकसभा मतदारसंघात समाविष्ठ तालुकाध्यक्षांच्या मुलाखती पाच जून रोजी आहेत.
जिल्ह्यातील सगळया तालुक्यामध्ये अध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे. यामुळे विद्यमान तालुकाध्यक्षांवर टांगती तलवार आहे. दरम्यान भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर हे मुलाखत घेणार आहेत. नागाळा पार्क येथील भाजपा कार्यालयात या मुलाखती होणार आहेत. ३० मे आणि पाच जून रोजी होणाऱ्या मुलाखतीत इच्छुकांच्या संघटनात्मक कामगिरीचा लेखाजोखा होणार आहे.
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसह लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत. यामुळे संघटनात्मक बांधणी भक्कम केली जात आहे. शिवाय जिल्हा आणि तालुकाध्यक्षांच्या पदाची मुदत संपली आहे. काही दिवसापूर्वी कोल्हापूर महानगर, कोल्हापूर जिल्हा ग्रामीण आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ जिल्हाध्यक्षपदासाठी मुलाखती झाल्या. त्या पाठोपाठ आता तालुकाध्यक्षांच्या निवडीसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे.
……………………….
जुन्यांना प्राधान्य की नवीन लोकांना संधी !
गेल्या काही वर्षात भारतीय जनता पक्षाकडे अन्य पक्षातील कार्यकर्ते आकृष्ट झाले आहेत. विधानसभा डोळयासमोर ठेवून पूर्वाश्रमीचे दोन्ही काँग्रेसमधील पदाधिकारी भाजपात दाखल झाली. त्यांच्यासोबत त्यांचा गटही भाजपात सक्रिय आहे. ही मंडळी भाजपात सामील असले तरी अजूनही काही ठिकाणी गट म्हणून त्यांचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहेत. पक्षातंर्गत निवडी व अन्य कमिटीवर पदाधिकारी निवडीवेळी जुने व नवीन यावरुन पक्षातंर्गत कुरघोडी होत असल्याचे कार्यकर्ते सांगतात. तेव्हा भाजप तालुकाध्यक्ष निवडताना कोणाला संधी मिळणार ? जुने पदाधिकारी प्रभाव राखणार की अलीकडे पक्षात  सक्रिय झालेले बाजी मारणार ? अशी चर्चाही कार्यकर्ते करत आहेत.
…………..
तालुकानिहाय सध्याचे पक्षाचे विद्यमान तालुकाध्यक्ष
करवीर –हंबीरराव पाटील, कागल-संजय यशवंत पाटील बेलवळे, राधानगरी- संभाजी यशवंत आरडे, भुदरगड - विनायक पांडूरंग परुळेकर, आजरा - सुधीर कुंभार , चंदगड - नामदेव विष्णू पाटील, गडहिंग्लज - विठ्ठल दादू पाटील, गगनबावडा - संदीप रघुनाथ पाटील , शिरोळ-राजवर्धन विठ्ठलराव निंबाळकर, शाहूवाडी - विजय बाळू रेडेकर , पन्हाळा - सचिन बाबुराव शिपुगडे, हातकणंगले – राजेश तात्यासो पाटील, कोल्हापूर दक्षिण - महेश कुंडलिक मोरे, जयसिंगपूर-रमेश मुकुंद येळगूडकर, इचलकरंजी-अनिलकुमार देवकरण डाळया
…………………………