+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही-नितीन बानुगडे पाटील adjustकोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा जणांना पोलिस महासंचालक पदक जाहीर adjustफिरंगाई देवीचा पालखी सोहळा उत्साहात adjustइंजिनीअरिंग असोसिएशनतर्फे उद्योगश्री पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण adjust२५ हजाराची लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अटक adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल
Screenshot_20240226_195247~2
schedule27 Mar 24 person by visibility 110 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची निश्चिती केली आहे. या स्टार प्रचारकमध्ये चाळीस जणांचा समावेश आहे यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघात स्रटार प्रचारक म्हणून ते पक्षाची ध्येय धोरणे मांडणार आहेत.
भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षा आघाडीने यावेळी महाराष्ट्रातून 45 अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. महाराष्ट्रातील प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्राध्यक्ष जे.पी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अनुराग ठाकूर, स्मृती इराणी, ज्योतिरादित्य शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार , माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री पंकजा मुंडे, भाजपचे नेते विनोद तावडे आशिष शेलार हे राज्याचा दौरा करणार आहेत.