+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा ! adjustदूध वाढीसाठी कुशिरेचं पुढचं पाऊल, करनाल, कोलारमधून आणले पशुधन adjustचेतन नरकेंची निवडणुकीतून माघार ! भविष्यात चार पावलांची झेप घेण्यासाठी दोन पाऊल मागे !! adjustहॅटस ऑफ, यूपीएससीत कोल्हापूरच्या तिघांचे यश
Screenshot_20240226_195247~2
schedule29 May 23 person by visibility 228 categoryलाइफस्टाइल
आमदार ऋतुराज पाटील यांच्यासोबत  पाहणी
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
आमदार ऋतुराज पाटील यांच्या विनंतीनुसार प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी कोल्हापुरातील चित्रनगरीला भेट दिली. या ठिकाणी उपलब्ध सुविधा, सेट यांची माहिती घेतली. आ. पाटील यांनी चित्रनगरीमध्ये आपल्या एखाद्या चित्रपटाचे शूटिंग करावे अशी विनंती गोवारीकर यांना केली. यामुळे स्थानिक कलाकारांना संधी मिळेल आणि लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असेही  सांगितले.  गोवारीकर यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. चित्रपट सृष्टीसाठी कोल्हापूरने दिलेल्या योगदानाच्या आठवणी गोवारीकरण यांनी यावेळी सांगितल्या.
 सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास आमदार पाटील यांनी दिग्दर्शक गोवारीकर यांच्यासोबत चित्रनगरीला भेट दिली. यावेळी चित्रनगरीचे व्यवस्थापक दिलीप भांदीगरे यांनी त्यांना त्या ठिकाणी असलेला वाडा, कोर्ट, हॉस्पीटल, पोलीस स्टेशन, यासह अन्य सेटची सविस्तर माहिती दिली. तसेच चित्रनगरीमध्ये उपलब्ध असलेली लोकेशन्स सुध्दा दाखविली. चित्रपट सृष्टीचे माहेरघर असलेल्या कोल्हापूरातील चित्रनगरीमध्ये अशा प्रकारच्या सर्व गोष्टी पाहून गोवारीकर यांनी समाधान व्यक्त केले. तसेच मालिकांच्या शुटींगबरोबरच चित्रपटांचे शुटींग होणे आवश्यक असून त्यामुळे कोल्हापूर चित्रनगरीची फिल्म इंडस्ट्रीमध्ये चांगली इमेज तयार होईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी अष्टविनायक मिडियाचे संग्राम पाटील, डॉ. महादेव नरके, मोरेवाडीचे सरपंच ए.व्ही. कांबळे, ग्रा.पं. सदस्य अमर मोरे,  सिद्धी कारंडे, सुदर्शन पाटील, ऋषिकेश व्हुन्नुरे, उजळाईवाडीचे नंदकुमार मजगे उपस्थित होते.