Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
अरुंधती महाडिकांची अध्यक्षपदाची कारकिर्द ठरली संस्मरणीय ! रोटरी मिडटाऊनला पंधरा पुरस्कार !!शुक्रवारी शाळा सुट्टीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशशिवसेनेच्या तरुण नेतृत्वाकडे विकासात्मक दृष्टी ! सचिन पाटलांची नाळ समाजकार्याशी जुळलेली! !जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या वंदना विजय पाटील भाजपातमहे-जरगवाडीत घुमला शिवसेनेचा आवाज, सचिन पाटलांच्या प्रचारफेरीला मतदारांचा जोरदार प्रतिसाद इच्छुकांची स्थायीसाठी तयारी, माधुरी किरण नकातेनी घेतली आमदारांची भेट कॉलेजने केले अर्थसहाय्य, राष्ट्रीय स्पर्धेत विद्यार्थ्याकडून केआयटीचा डंकाघोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान डॉ. राजेश ख्यालप्पा यांना एफआयसीपी फेलोशिपसचिन पाटलांच्या उमेदवारीला मिळतेय मतदारांची पसंती, तरुण नेतृत्वात विकासकामाची धडाडी

जाहिरात

 

अरुंधती महाडिकांची अध्यक्षपदाची कारकिर्द ठरली संस्मरणीय ! रोटरी मिडटाऊनला पंधरा पुरस्कार !!

schedule04 Feb 26 person by visibility 48 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीनं गेल्या काही वर्षात कोल्हापूरसह परिसरातील विविध जिल्हयांमध्ये शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबवले आहेत. विशेषत: २०२४ ते २०२५ या कालावधीत  रोटरी क्लब मिडटाऊनने अनेक समाजहिताचे प्रकल्प राबवले. त्याची दखल घेवून यावर्षी रोटरी मिडटाऊनला तब्बल १५ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या माजी अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी ११ जुलै २०२४ रोजी अरुंधती महाडिक यांची निवड झाली. निवडीनंतर त्यांनी राबवलेल्या विविध नियोजनबध्द कार्यक्रमाचा समाजातील अनेक घटकांना मोठा फायदा झाला. रोटरी मिडटाऊनला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल क्लबच्या माजी प्रेसिडेन्स यांचा सत्कार, दिव्यांगांना व्हिलचेअर आणि सायकलीसह विविध दिव्यांग सहाय्यक साधनांचे वाटप, हेल्मेट वापरण्यासाठी जनजागृती मोहिम, वर्षभराच्या कालावधीत सुमारे १५० पेक्षा अधिक आरोग्य आणि वैद्यकीय शिबीरांचे आयोजन केले. रोटरीसाठी डॉ. रेश्मा आणि डॉ. सुरज पवार, खासदार धनंजय महाडिक आणि  अरूंधती महाडिक तसेच पृथ्वीराज महाडिक  आणि भारती आणि करूणाकर नायक यांच्याकडून मोठा निधी प्रदान केला.

महाडिक यांच्या अध्यक्षपदाच्या वर्षभराच्या कालावधीत विविध उपक्रम राबविले. या उपक्रमांची दखल घेवून रोटरी मिडटाऊनला तब्बल १५ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये बेस्ट प्रेसिडेंट म्हणून रोटेरियन अरूंधती महाडिक, हायेस्ट कॉंट्रीब्युशन इन टोटल गिव्हींग, बेस्ट इन अर्बन रूरल रिलेशन, बेस्ट इन मेंबरशिप रिटेंशन, आऊट स्टँडींग कम्युनिटी सर्व्हीस प्रोजेक्ट, बेस्ट इन युथ सर्व्हीस, मेजर डोनरचे ४ पुरस्कार, २ ग्लोबल ग्रँड प्रोजेक्टचे पुरस्कार, द मॅजिक ऑफ रोटरी फौंडेशन लिगसी ऍवॉर्ड, बेस्ट क्लब बुलेटिन मंथली आणि बेस्ट ऍवॉर्ड फॉर आऊटस्टँडींग कम्युनिटी सर्व्हीस प्रोजेक्ट अशा १५ पुरस्कारांचा समावेश आहे. रोटरीच्या पदाधिकार्‍यांसह तत्कालीन सहकार्‍यांची साथ आणि सहकार्य मिळाल्यानेच एवढ्या मोठ्या संख्येने उपक्रम राबवणे शक्य झाल्याचेही महाडिक यांनी नमूद केले. पत्रकार परिषदेला रोटरीचे सचिव विकास राऊत, बी एस शिंपुकडे, अनिरूध्द तगारे, ऍड. अनिल देशपांडे, भारती नायक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes