दळवीजच्या सोळा विद्यार्थ्यांच्या कलाकृती राज्य कला प्रदर्शनात
schedule13 Dec 24 person by visibility 68 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य कलाशिक्षण मंडळातर्फे नागपूर येथे आयोजित राज्य कला प्रदर्शनामध्ये येथील दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतींची निवड झाली आहे. यामध्ये मूलभूत अभ्यासक्रम वर्गातून मनाली पाटील, संकेत जाधव, विवेक पाटील, चिंतन गुळस्कर, किरण यादव, निरंजन सावंत, सक्षम देसाई, आर्यन देवाळे यांच्या कलाकृतींचा समावेश आहे. इंटरमिजिएट वर्गातून विराज गावडे, अॅडव्हान्स वर्गातून मयूर कोंडूसकर, डिप्लोमा वर्गातून कशिष पटेल, कशिष अडसूळ, नेहा चव्हाण, प्रणाली पवार, अमेय हिरेमठ यांच्या कलाकृती निवडल्या आहेत. संदेश कांबळी यांच्या दोन कलाकृती कला प्रदर्शनात असतील. या विद्यार्थ्यांना प्रा. अर्चना आंबिलढोक, प्रा. संजय गायकवाड, प्रा. दीपक कांबळे, प्रा. अभिजीत कांबळे, प्रा. प्रवीण वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले.