धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, अखेर सरकार नमले
schedule25 Jul 26 person by visibility 214 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय मंत्री शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा शनिवारी 25 जुलै 2026 रोजी राजीनामा झाला. प्रधान यांच्या राजीनामासाठी गेली अनेक दिवस आंदोलने सुरू आहेत. कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन उभे केले आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी तब्बल 26 दिवस उपोषण केले होते. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामासाठी देशभर आंदोलने झाली. प्रत्येक राज्यांमध्ये विद्यार्थ्यांनी सरकारच्या धोरणावर टीका करत प्रधानांना पदावर हटवा अशी मागणी केली होती. संसदेतही या प्रश्नी विरोधी पक्ष नेत्यांनी आवाज उठवला होता.विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले होते. नीट पेपर फुटी प्रकरणी सारा देश ढवळून निघाला होता. सरकारवर दबाव वाढत चालला होता. विद्यार्थी आंदोलनापुढे अखेर त्यांना नमते घ्यावे लागले. प्रधान यांनी शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिला.