Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
भाऊ पाध्ये हे मानवतावादी, अनुभववादी लेखक - समीक्षक प्रा. अविनाश सप्रे कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्याघघ ततकोल्हापुरात निवासी फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी सुरु करण्यास तत्वत: मान्यता - राजेश क्षीरसागरांचा पाठपुरावा, क्रीडामंत्र्यांचे विधीमंडळात उत्तर !!शिवसेना इच्छुक उमेदवारांच्या प्रशिक्षण कार्यशाळेला जोरदार प्रतिसादमहापालिका निवडणुकीच्या जागा वाटपासाठी काँग्रेसची समिती, चार दिवस मित्रपक्षांशी चर्चासातारा-कागल महामार्गाच्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करा : खासदार धनंजय महाडिककोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनचे पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण समारंभअभ्यासाचा भोंगा…!सतेज पाटलांनी गाजविली विधान परिषद, गृहखात्यासह सरकारच्या कामकाजाचे काढले वाभाडे

जाहिरात

 

कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

schedule12 Dec 25 person by visibility 235 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. विभागीय आयुक्तांनी नियुक्तीचे आदेश काढले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून करवीर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप भंडारे, भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती रुपाली चौगुले, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी शक्ती मारुती कदम, सातारा येथील गटविकास अधिकारी सुशील संसारे, आजरा भुदरगड येथील उपविभागीय अधिकारी हरेश सूळ, पन्हाळा येथील उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, गडहिंग्लज उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे यांची नियुक्ती केली आहे.  सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून करवीरचे नायब तहसीलदार सुधीर वाघमारे, भालचंद्र यादव, जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार दिगंबर सानप, कागल येथील महसूल विभागाचे नायब तहसीलदार  सुशांत कांबळे, पन्हाळा येथील नायब तहसीलदार विजय जाधव, हातकणंगले येथील नायब तहसीलदार संदीप चव्हाण, शिरोळ येथील नायब तहसीलदार विनायक कौलवकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्यासाठी आवश्यक कार्यालयांची पाहणी केली.कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक मूलभूत सुविधा, जागेची उपलब्धता, तांत्रिक बाबी, सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेतला. हॉकी स्टेडियम, राजोपाध्येनगर बॅडमिंटन हॉल, दुधाळी मैदान, गांधी मैदान, शेठ रुईया विद्यालय, छत्रपती शिवाजी मार्केट, एलबीटी कार्यालयाची पाहणी केली. याप्रसंगी जल अभियंता हर्षजीत घाटगे, निवडणूक अधीक्षक सुधाकर चल्लावाड, कनिष्ठ अभियंता अक्षय काटकर, पर्यवेक्षक विजय माळी आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes