काँग्रेसकडून बाबासो चौगुले, अभिजीत तायशेटे, प्रकाश पाटील, रामराज कुपेकर, सचिन घोरपडे, राहूल देसाई, अंजना रेडेकरांचे अर्ज
schedule17 Sep 26 person by visibility 121 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेस प्रणित राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीकडून गोकुळचे माजी संचालक बाबासो चौगुले, अभिजीत तायशेटे, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, रामराज कुपेकर, अंजना रेडेकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल देसाई, सचिन दौलतराव घोरपडे, विद्याधर गुरंबे, गीता निवास पाटील, उदय पाटील, धीरज डोंगळे, कुडाळ येथील ए. डी. पाटील, विशाल पाटील आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले. शशिकांत पाटील चुयेकर यांनी दुसऱ्यांदा उमेदवारी अर्ज भरला. रमणमळा येथील बहुउद्देशीय सभागृह येथे निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगले यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी इच्छुक उमेदवार काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालय येथे जमले. यावेळी आमदार पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर इच्छुक उमेदवार निवडणूक कार्यालयात आले. आमदार पाटील यांनी गोकुळची निवडणूक लढवायची म्हणून जिल्हाभर दौरे केले आहेत. संपर्क दौऱ्यात त्यांनी विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.