रमेश मस्करांच्या कालावधीत पैसे खाण्याची टक्केवारी वाढली, पदोन्नतीवरून महापालिकेत हंगामा ! सत्ताधारी- विरोधक आमनेसामने !!
schedule16 Sep 26 person by visibility 83 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर महापालिकेच्या शहर अभियंतापदी रमेश मस्कर यांना पदोन्नती देण्यावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये चांगलाच हंगामा झाला. मस्कर यांना शहर अभियंतापदी तत्काळ पदोन्नती देऊ नये हा विषय पुढील मिटींगला घेऊ या असा आग्रह सत्ताधारी महायुतीच्या नगरसेवकांनी धरला. तर विरोधी महाविकास आघाडी अर्थात काँग्रेसच्या नगरसेवकांनी पदोन्नतीचा ठराव मंजूर करा. पुढील बैठकीत हा ठराव घेण्याचे कारणच काय ? अशी विचारणा केली. यावरून सभागृहातील वातावरण चांगलेच तापले. दोन्ही बाजूचे नगरसेवक आपापल्या भूमिकेवर ठाम राहिले. .जवळपास अर्धा तास या विषयावरून गोंधळ सुरू होता. सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाकावरील सदस्य एकाचवेळी उभे राहून बोलण्यास सुरुवात केल्याने गोंधळात आणखीनच भर पडली. सिटी इंजिनियर म्हणून कामकाज पाहायला सुरुवात केल्यापासून रमेश मस्कर यांच्या कालावधीत टक्केवारी वाढली. विकास कामांच्या मंजुरीसाठी दोन टक्के वरील रक्कम तीन टक्क्यांपर्यंत पोहोचलीअसा खळबळजनक आरोप शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी केला. तर प्रा जयंत पाटील यांनी रमेश मस्करांच्या कामाचा लेखाजोखा मांडायला सभागृहात सुरुवात केली तर त्यांना निलंबित व्हायची वेळ येईल असा इशारा दिला. पतोनुतीच्या ठरावावरून महायुतीचे नगरसेवक प्रा. जयंत पाटील व महाविकास आघाडीचे नगरसेवक सुनील मोदी यांच्यामध्ये खडाजंगी उडाली.
महापौर रुपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली व आयुक्त राजेंद्र भारूड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बुधवारी 16 सप्टेंबर 2026 रोजी महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली. या सभेमध्ये सामान्य प्रशासन विभागाने महापालिका आस्थापनावरील वर्ग एक मधील रिक्त असलेल्या शहर अभियंता पदावर पदोन्नती देणे बाबत ठराव मांडला होता. या विषयावरील चर्चेत सहभागी होताना प्रा. जयंत पाटील यांनी या विषयावरून प्रशासनावर प्रश्नांचा भडीमार केला.सेवानिवृत्त उप अभियंता एन एस पाटील हे चार वर्षे पदोन्नतीसाठी प्रतिक्षेत होते. महापालिकेकडे हेलपाटा मारत होते. मात्र महापालिका प्रशासनाने त्यांना सेवानिवृत्तीच्या आदल्या दिवशी पदोन्नती दिली शेवटपर्यंत त्यांना महापालिकेची गाडी दिली नाही. एका अधिकाऱ्याला एक न्याय आणि रमेश मस्कर यांच्या पदोन्नतीसाठी प्रशासनाचा इतका आग्रह कशासाठी? महापालिका काय त्यांचे देणे लागते का ? रमेश मस्कर यांच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडायला सुरुवात केली, तर त्यांच्यावर निलंबनाची वेळ येईल. ' असा गर्भित इशारा दिला. प्रा. पाटील यांच्या या विधानावर महाविकास आघाडीचे नगरसेवक सुनील मोदी यांनी,' वैयक्तिक विषय घेऊ नका. पदोन्नतीचा प्रस्ताव मंजूर करू या.' असे सुचवले. विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी ठराव मंजूर करण्याच्या बाजूने बोलत सगळ्या विभागातील पदोन्नतीबाबतची यादी प्रशासनाने जाहीर करावी असा मुद्दा मांडला. पदोन्नतीच्या विषयाच्या मंजूर व नामंजूरवरून सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये दुमत वाढत गेले. एकाच वेळी दोन्ही बाकावरील सदस्य उभे राहून बोलू लागल्याने गोंधळात आणखीनच भर पडली. प्रा पाटील यांनी ,' प्रशासनामध्ये एक टोळी तयार झाली आहे. वर्ग ते चार मधील कर्मचाऱ्यांवर तीन मध्ये पदोन्नती देतो असे सांगून लाखो रुपये उकळले जात आहेत. मात्र त्या टोळीने गरीब कर्मचाऱ्यांना त्रास देऊ नये. महापालिकेत एखादे जनावर जरी मेले तरी त्याचा वास राजेंद्रनगर पर्यंत पोहोचतो हे संबंधिताने लक्षात ठेवावे. कोणत्याही चुकीच्या गोष्टी खपवून घेतली जाणार नाही. स्वच्छ भावनेने काम करणारी माणसे नेमा' असा दिला. पदोन्नती संदर्भात आम्ही कोणाची सुपारी घेतली नाही आणि कोणाला सुपारी घेऊ देणार नाही' असा टोलाही त्यांनी लगावला.
प्रा. पाटील यांच्या या विधानावर काँग्रेसच्या नगरसेवकांनी ' महापालिका सभागृहातील विषय हे कोणीही वैयक्तिक घेऊ नयेत. जागा रिक्त असेल तर पदोन्नती द्यायला हवी, कामे मार्गे लागतात 'असा मुद्दा लावून धरला.
नगरसेवक सुनील मोदी यांनी रमेश मस्कर यांच्याकडे गेली चार महिने प्रभारी म्हणून कारभार आहे. यापूर्वी झालेल्या अधिकाऱ्यांच्या कामकाजाबद्दल कोणी का बोलत नाही अशी विचारणा केली. त्यावर शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी रमेश मस्कर यांना शहर अभियंता पदाचा प्रभारी कारभार कधीपासून पाहत आहे ? अशी विचारणा केली त्यावर मस्कऱ यांनी एक वर्ष झाले असे सांगितले. त्यावर देशमुख यांनी गेल्या वर्षभरात प्रभारी शहर अभियंता म्हणून मस्कऱ यांनी कोणकोणत्या प्रकल्पांना भेटी दिल्या ? कोणत्या विकास कामांचा लेखाजोखा घेतला ? 100 कोटी निधी अंतर्गत माझ्या प्रभागात साडेसतरा कोटीच्या रस्त्याचे काम मंजूर आहे. त्या कामाच्या पूर्ततेसाठी मस्कर यांनी किती वेळा पाहणी केली ? त्यांना, हे काम जलद गतीने पूर्ण व्हावे यासाठी मी किमान दोनशे वेळा फोन केला असेल... मात्र त्यांनी किती वेळा प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट दिली ? असा प्रश्नांचा भडीमार करीत प्रशासन व मस्कर यांना धारेवर धरले. मस्कर यांच्याकडे शहर अभियंता पदाचा पदभार आल्यापासून विकासकामांच्या मंजुरीसाठीची टक्केवारीची रक्कम दोन टक्केवरून तीन टक्यावर पोहोचली असा हा खळबळजनक आरोपी देशमुख यांनी केला. तसेच शहर अभियंता पदासाठी महापालिका मंत्रालयाकडे एक नाव पाठवले मंत्रालयात दुसऱ्याच नाव मंजूर झाले आणि नियुक्ती मध्ये तिसऱ्याची निघाली या बदल्यांच्या स्ट्रक्चरमध्ये मस्कर यांचे नाव जोडले जाते असा आरोप ही त्यांनी केला. सत्ताधारी नगरसेवकांनी पदोन्नतीच्या ठरावाला विरोध केल्याने हा विषय पुढील मिटिंग मध्ये घेण्याचे ठरले.