Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राष्ट्रवादीकडून गोकुळसाठी राजेश पाटील, अरुण डोंगळे, रणजितसिंह पाटील, प्रा. किसन चौगले, वसंतराव धुरे, सतीश पाटलांचे अर्जजनसुराज्यकडून गोकुळसाठी अमरसिंह पाटील, करणसिंह गायकवाड, सिदगोंडा पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल अजून लोकसभा - राज्यसभा- आमदारकी- विधानपरिषद शिल्लक , बघू या काय काय होते: अरुण डोंगळेविश्वास पाटील यांचे दोन गटातून अर्ज दाखल ! सुरेश देसाई, सुरेश कुराडेंनी भरला उमेदवारी अर्ज !!कलाश्री महोत्सवात भाव - भक्ती-नाट्य संगीताची सुरेल मैफिलरमेश मस्करांच्या कालावधीत पैसे खाण्याची टक्केवारी वाढली, पदोन्नतीवरून महापालिकेत हंगामा ! सत्ताधारी- विरोधक आमनेसामने !!गणेशभक्तांसाठी खुशखबर, घरगुती गणेशोत्सव देखावा स्पर्धाक्रिडाई कोल्हापूरतर्फे राष्ट्रीय अभियंता दिननृत्यांगना वर्षा  खाडिलकर, निधी आलासेंच्या नृत्याविष्काराने रसिक-प्रेक्षक मंत्रमुग्धगोकुळच्या निवडणुकीसाठी नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील-चुयेकर,  बाळासाहेब खाडेंचे अर्ज दाखल

जाहिरात

 

राष्ट्रवादीकडून गोकुळसाठी राजेश पाटील, अरुण डोंगळे, रणजितसिंह पाटील, प्रा. किसन चौगले, वसंतराव धुरे, सतीश पाटलांचे अर्ज

schedule17 Sep 26 person by visibility 138 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीसाठी महायुती अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी चेअरमन, संचालकांसह अन्य पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. माजीं आमदार राजेश पाटील, गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, गोकुळचे माजी संचालक रणजितसिंह कृष्णराव पाटील, प्रा. किसन चौगले, युवराज पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंतराव धुरे आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉल येथे गुरुवारी, १७ सप्टेंबर रोजी येथे निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगले यांच्याकडे अर्ज दाखल केले. याप्रसंगी माजी आमदार के. पी. पाटील,गोकुळचे माजी चेअरमन नविद मुश्रीफ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, बाजार समिती सभापती शेखर जाधव, जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे गटनेते सुधीर देसाई,  सदस्य शिरीष देसाई, भोगावतीचे माजी चेअरमन धैर्यशील पाटील, बिद्रीचे संचालक फत्तेसिंह सावंत, राजेंद्र पाटील, हुतात्मा वारके सूतगिरणीचे चेअरमन उमेश भोईटे, नानासो पाटील, संजय कलिकते, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विनय पाटील, दत्ता पाटील, विकास पाटील कुरुकलीकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी माजी चेअरमन नविद मुश्रीफ, माजी संचालक बाळासाहेब खाडे यांनी अर्ज दाखल केला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes